क्षुल्लक कारणावरुन मंदिरात पुजारी आणि भाविकामध्ये फ्रि स्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल!

काही भाविक हरिद्वारमधील सिद्धपीठ दक्षिण काली मंदिरात आले होते. तो गाडी मंदिराच्या आवारात घेऊन गेला असता पार्किंगवरुन वाद झाल्यानंतर पुजारी आणि भाविकांमध्ये हाणामारी झाली.

  आजकाल क्षुल्लक क्षुल्लक कारणावरून लोकांचा राग अनावर होतो आणि ते हाणामारी करायलाही मागे पुढे पाहात नाही. मंदिरासारख्या ठिकाणीही लोकं भांडणं करतात. हे म्हणण्याचं कारण म्हणजे सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये भाविक आणि मंदिराच्या पुजाऱ्यांमध्ये फ्रि स्टाईल हाणामारी (Priests Beating Devotees) झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश सहारनपूर येथील सिद्धपीठ दक्षिण काली मंदिरात (Haridwar Siddhpeeth Dakshin Kali Temple) भाविक आणि पुजारी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. पार्किंगच्या स्लिप कापण्यावरून हा वाद झाला. यावेळी पुजारी  आणि कर्मचाऱ्यांनी भाविकांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली.

  नेमका प्रकार काय?

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी उत्तर प्रदेश सहारनपूरमधील काही भाविक हरिद्वारमधील सिद्धपीठ दक्षिण काली मंदिरात आले होते. तो गाडी मंदिराच्या आवारात घेऊन गेला असता कर्मचाऱ्यांनी त्यांना पार्किंग शुल्क भरण्यास सांगितले. यावरून भाविक आणि पुजाऱ्यामध्ये वाद झाला. यावेळी भाविकांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून मंदिरातील इतर पुजारीही जमा झाले. त्यांनीही भाविकांना समजावण्याचा प्रयत्न केला. भाविकांनी त्याच्याशी गैरवर्तन करून बाचाबाचीही केल्याचा आरोप आहे. यानंतर पुजारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून भाविकांचा पाठलाग केला.

  सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

  त्यांना काठीने बेदम मारहाण केली. माहिती मिळताच चंडी घाट चौकीच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाद शांत केला. घटनेनंतर भाविक घटनास्थळावरून निघून गेले. मारामारीचे वेगवेगळे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  पोलिस ठाण्याचे प्रमुख नितेश शर्मा यांनी दक्षिण पीठाधीश्वर स्वामी कैलाशानंद गिरी यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. एसओ म्हणाले की, सध्या कोणत्याही पक्षाकडून लेखी तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल.