
मुंबई : मेट्रोचा वेग हा तुलनेनं इतर ट्रेन पेक्षा सुपरफास्ट समजला जातो. अशातच एका धावपटूने माणसाच्या वेगाशी नाही तर थेट मेट्रोच्या वेगाशी बरोबरी केली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडिओत एका धावपटूने चक्क मेट्रोशी स्पर्धा करत एका स्टेशनवरून सोडलेली ट्रेन धावत पळत दुसऱ्या स्टेशनवर जाऊन पडकली आहे.
This runner exited a train, ran to the next stop, on got back on the same train pic.twitter.com/mk8PPynVqa
— Vala Afshar (@ValaAfshar) December 27, 2022
वाला अफशर या ट्विटर यूजरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन देत “हा धावपटू ट्रेनमधून बाहेर पडला, पुढच्या स्टॉपवर धावला, त्याच ट्रेनमध्ये परत आला” असे लिहिले आहे. या व्हिडिओत आपल्याला पहायला मिळेल की एका स्टेशनला मेट्रो थांबते, त्यातून एक युवक बाहेर पडतो. तो युवक पुढच्या स्टेशनवर तीच मेट्रो पकडण्यासाठी शहरातील रस्त्यांमधून वाट काढत जिवाच्या आकांताने धावतो आणि शेवटी ती मेट्रो पुढच्या स्टेशनवर जाऊन पकडतो. या युवकाच्या थरारक कृत्यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. युवकाच्या या प्रयोगाला प्रेक्षकांनी लाईक्स आणि कमेंट्स करून दाद दिली आहे.