Radhika-Merchant-Mehndi-Ceremony

राधिका मर्चंटने (Radhika Merchant) मेहंदी सोहळ्यासाठी खास गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा घातला होता. हिरव्या कुंदनसारख्या ज्वेलरीमध्ये राधिकाचे सौंदर्य खुलून आले आहे. राधिका एक उत्तम डान्सर असून तिने भरतनाट्यमचे शिक्षण घेतलेले आहे. मेहंदी सोहळ्यात राधिका ‘घर मोहे परदेसिया’ या बॉलीवूड गाण्यावर (Radhika Merchant Dance Video) थिरकताना दिसत आहे.

    देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि वीरेन मर्चंट (Viren Merchant)  यांच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट (Viren And Radhika Wedding) यांचं लवकरच लग्न होणार आहे. मंगळवारी राधिकाचा मेहंंदी सोहळा पार पडला. राधिकाच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

    इन्स्टाग्रामवर मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. राधिका मर्चंटने (Radhika Merchant) मेहंदी सोहळ्यासाठी खास गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा घातला होता. हिरव्या कुंदनसारख्या ज्वेलरीमध्ये राधिकाचे सौंदर्य खुलून आले आहे. राधिका एक उत्तम डान्सर असून तिने भरतनाट्यमचे शिक्षण घेतलेले आहे. मेहंदी सोहळ्यात राधिका ‘घर मोहे परदेसिया’ या बॉलीवूड गाण्यावर (Radhika Merchant Dance Video) थिरकताना दिसत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गेल्याच महिन्यात साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर मुंबईत एका ग्रँड पार्टी देण्यात आली होती. अनंत अंबानी व राधिका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Akash Ambani (@akashambani_fc)


    राधिका ही मुकेश अंबानी यांचे मित्र वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. वीरेन मर्चंट एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. राधिकाने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण केले. तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. राधिकाने 2017 मध्ये Isprava टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले.

    राधिकाच्या परिवाराला कच्छी भाटिया परिवार म्हटले जाते. ते मुळचे गुजरातमधील कच्छ भागातले आहेत. राधिकाचे वडील वीरेन मर्चंट यांचे वडील अजीतकुमार गोवर्धनदास मर्चंट हे देखील धीरुभाई अंबानी यांच्यासारखे साधारण ट्रेडरपासून मग प्रसिद्ध उद्योगपती झाले होते. वीरेन यांच्या कुटुंबात पत्नी शैला, मुलगी अंजली आणि राधिका आहेत. वीरेन मर्चंट यांच्या पत्नी शैला या एन्कोर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये डायरेक्टर आहेत.