Ramnath Kovind after the president term is over see the viral video nrvb

@SanjayAzadSln या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद कार्यकाळ संपल्यांनतर सर्वांचा निरोप घेतना दिसत असून ते नमस्कारही करत आहेत.

    दररोज काही ना काही नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Videos Viral On Social Media) होत असतात. असाच एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. यात महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) व्हिडिओत सर्वांना नमस्कार करताना दिसत आहेत.

    @SanjayAzadSln या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद कार्यकाळ संपल्यांनतर (Term Over) सर्वांचा निरोप घेतना दिसत असून ते नमस्कारही करत आहेत. व्हिडिओत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) समोर आले असताना पंतप्रधानांनी त्यांच्याकडे पाहणं टाळलं आहे.

    युजर्सने नेमकं हेच हेरत त्याच क्षणावर कमेंट केली आहे.

    ‘ऐसा अपमान Very Sorry Sir
    ये लोग ऐसे ही हैं, आपका कार्यकाल ख़त्म अब आपकी तरफ़ देखेंगे भी नही।’

    असं या कमेंटमध्ये युजरने म्हटलं आहे. या व्हिडिओला बातमी लिहेपर्यंत 217.4K व्हूज मिळाले असून ३,३२४ जणांनी त्यावर कमेंट केल्या असून तो ३,४९८ जणांनी रिट्विट केला आहे तर ९६७४ लोकांनी त्याला लाइक केलं आहे.