flight

नुकतीच 37 वर्षांच्या एका अमेरिकन नागरिकाला लंडन ते मुंबई या विमानात धूम्रपान केल्याच्या आरोपांत (Smoking In Flight) अटक करण्यात आली होती. प्रवाशाला कोर्टात उभं करण्यात आलं. जामिनासाठी त्याच्याकडून 25 हजार रुपये मागण्यात आले. मात्र या मुजोर अमेरिकन नागरिकाने (American Citizen) जामिनासाठी एवढे पैसे देण्यास नकार दिलाय.

नवी दिल्ली: विमान प्रवासात होणाऱ्या अनेक गमती जमती आणि गंभीर प्रकरणं सध्या चर्चेत आहेत. नुकतीच 37 वर्षांच्या एका अमेरिकन नागरिकाला लंडन ते मुंबई या विमानात धूम्रपान केल्याच्या आरोपांत (Smoking In Flight) अटक करण्यात आली होती. या अमेरिकन व्यक्तीनं या वेळी संतापाच्या भरात इमर्जन्सी दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केला होता. तसंच दुसऱ्या एका प्रवाशाला त्यानं लाथही मारली होती. त्यानंतर प्रवाशाला कोर्टात उभं करण्यात आलं. जामिनासाठी त्याच्याकडून 25 हजार रुपये मागण्यात आले. मात्र या मुजोर अमेरिकन नागरिकाने (American Citizen) जामिनासाठी एवढे पैसे देण्यास नकार दिलाय. केवळ 250 रुपये इतकीच जामिनाची (Refusing To Pay Bail Amount) रक्कम देईन, यावर हा आरोपी अडून बसला. 250 रुपयेच का, याचंही स्पष्टीकरण त्यानं दिलंय. इंटरनेटवरवर या गुन्ह्यासाठी आयपीसीचे कलम 336 अंतर्गत केवळ 250 रुपयांची जामिनाची रक्कम आहे, असं त्यानं सांगितलंय.

आरोपीची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी
आरोपी ठाम राहिल्यानंतर कोर्टानं या आरोपीची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये केली आहे. रत्नाकर द्विवेदी असं या आरोपीचं नाव आहे. व्यावसायिक असल्याचा दावा त्यानं केला आहे. अंधेरीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला बाहेरच्या देशात जाण्यास मज्जावही केला आहे.

आयपीसीच्या 336 कलमांतर्गत गुन्हा
बेपर्वाई आणि घाई केल्याचा गुन्हा द्विवेदी याच्यावर लावण्यात आलाय. त्यानं विमानात केलेल्या कृतीमुळं इतरांचा जीव धोक्यात येऊ शकला असता. ज्यावेळी द्विवेदी याला दंड सुनावण्यात आला, त्यावेळी त्यानं दंडाची रक्कम देण्याऐवजी जेलमध्ये राहू, असं पोलीस आणि वकिलांना सांगितलं. शनिवारी सहार पोलिसांनी एक नोटीस बजावत त्याला सोडण्याची तयारी केली होती. मात्र त्याचा अमेरिकन पासपोर्ट जप्त करण्यात आला होता. सोमवारी त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्याला अटक करुन त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आलीय.