sandeep kshirsagar video

राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा शिर्डीत (Shirdi) आयोजित करण्यात आला होता. यावेळी संदीप क्षीरसागरांनी भन्नाट डान्स केलाय. त्याचाच व्हिडिओ सध्या सोशल माध्यमातून धुमाकूळ घालत आहे.

    बीड: बीड (Beed) विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांचा एका लग्नातील डान्स व्हायरल (Viral Video) होतोय. राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा शिर्डीत (Shirdi) आयोजित करण्यात आला होता. यावेळी संदीप क्षीरसागरांनी भन्नाट डान्स केलाय. त्याचाच व्हिडिओ सध्या सोशल माध्यमातून धुमाकूळ घालत आहे.

    या शाही विवाह सोहळ्याला राजकीय, सामाजिक, धार्मिक यासह इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याच सोहळ्यात बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही हजेरी लावली होती. यावेळी बँजोवरील ‘वर ढगाला लागली कळ’ आणि ‘मै हु डॉन’ या गाण्यावर संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी डान्स केला. यापूर्वीही आमदार क्षीरसागरांनी विविध कार्यक्रमात डान्स केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.