Viral News | शांततेच्या शोधात सौदी अरेबियातील व्यक्तीने ४३ वर्षात केले ५३ वेळा लग्न | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
Published: Sep 20, 2022 10:47 AM

Viral Newsशांततेच्या शोधात सौदी अरेबियातील व्यक्तीने ४३ वर्षात केले ५३ वेळा लग्न

शांततेच्या शोधात सौदी अरेबियातील व्यक्तीने ४३ वर्षात केले ५३ वेळा लग्न

    सौदी अरेबियातील (Saudi Arabia) एका व्यक्तीने ४३ वर्षांत ५३ वेळा लग्न करण्याचा विक्रम केला आहे. इतके लग्न करण्यामागचं कारणही या व्यक्तीने सांगितलं आहे. त्याने शांततेच्या शोधात ५३ वेळा लग्न केलं. या व्यक्तीचा दावा आहे की, त्याने वैयक्तिक आनंद नव्हे तर ‘स्थिरता’ आणि मन:शांती मिळवण्याच्या उद्देशाने ५३ वेळा लग्न केले आहे. त्या व्यक्तीते नाव अबू अब्दुल्ला, वय ६३ वर्षीय आहे. मी पहिले लग्न केले तेव्हा मी २० वर्षांचा होतो आणि माझी पत्नी माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी होती.

    “जेव्हा मी पहिल्यांदा लग्न केले, तेव्हा एकापेक्षा जास्त महिलांशी लग्न करण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. कारण तेव्हा मला आरामदायक वाटले आणि मला मुले झाली.” मात्र, काही वर्षांनी नात्यात अडचणी निर्माण झाल्या आणि अब्दुल्ला यांनी वयाच्या २३ व्या वर्षी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीमध्ये वाद झाला तेव्हा अब्दुल्ला यांनी तिसऱ्या आणि चौथ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला.

    नंतर त्याने आपल्या पहिल्या दोन पत्नींना घटस्फोट दिला. ते म्हणाले की, त्याच्या अनेक विवाहांचे साधे कारण म्हणजे त्याला आनंदी ठेवणारी स्त्री शोधणे.  अब्दुल्ला यांचा सर्वात कमी कालावधीचा विवाह फक्त एक रात्र टिकला. ६३ वर्षीय अब्दुल्ला यांनी बहुतांश सौदी महिलांशी लग्न केले असले तरी, त्यांनी परदेशातील व्यावसायिक प्रवासादरम्यान विदेशी महिलांशी विवाह केल्याचेही मान्य केले आहे. अब्दुल्लाने आता एका महिलेशी लग्न केले आहे असून आता पुढे लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.