हुश्श!!! परीक्षा संपली म्हणत मुलीचा भन्नाट डान्स, नाचत घरात एन्ट्री करातानाचा व्हिडीओ व्हायरल!

परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना आनंद होतो. आता एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात परीक्षा संपल्याचा आनंद मुलीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

    लहान मुले असो वा प्रौढ, शाळा महाविद्यालयीन जीवनात परीक्षा म्हणजे सगळ्यांसाठी टेन्शनच असते. उन्हाळ्यात परीक्षा सुरू झाल्यावर आपण आतुरतेनं परीक्षा संपण्याची वाट पाहतो. परिक्षा संपल्यावर जो आनंद होतो तो वेगळाच असतो. असाच आंनद एका मुलीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ही मुलगी परीक्षा संपल्याच्या आनंदात डान्स (School Girl Dance Video)करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावर एक सुंदर हसू येईल. परीक्षा संपल्याचा आनंद या मुलीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

    व्हिडिओमध्ये एक मुलगी शेवटचा पेपर देऊन घरी पोहोचते. ‘जमाल कुडू’ हे गाणे घरात आधीच वाजत असते. हे हे गाणं ऐकताच ती नाचू लागते आणि शाळेची दप्तर डोक्यावर घेऊन नाचत घरात शिरते. हा व्हिडिओ @arvindchotia यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर  शेअर केला आहे.

    मुलीच्या डान्स एन्ट्रीच्या वेळी तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहायल मिळत आहे. परीक्षेच्या शेवटी एवढा आनंद कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळाला असेल. मुलीची ही क्यूट स्टाइल युजर्सला खूप आवडली आहे. ते कमेंट करून ते प्रेम व्यक्त करत आहेत. एका युझरनं लिहिलं की, हा एक चांगला व्हिडिओ आहे. तर दुसऱ्या युजरनं लिहिलं – मुलं मनाने खरे असतात. तर एकाने लिहिले की – आम्हीही परीक्षा संपल्याचा आनंद साजरा केला, पण कोणीही ते रेकॉर्ड करू शकले नाही कारण त्यावेळी कॅमेरा आणि रील्स खूप महाग होते.