Scorpion and snake soup famous in China

चिकन सूप, फिश सूप, व्हिजीटेबल सूप सर्वांनात माहित आहे. मात्र, जगात सूपची अशी एक भयानक डिश आहे ज्याचं नाव ऐकून पण अंगावर काटा येईल. विंचू आणि सापाचे सूप. हे विचित्र सूप चायनामधील मोठी फेसम डीश आहे(Scorpion and snake soup famous in China). 

    चीनमधील लोक जिवंत प्राणी खाण्याचे शौकीन आहेत. चीनमध्ये शेकडो प्राणी शिजवून खाल्ले जातात. चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात विंचू आणि सापाचे सूप बनवले जाते. विंचू आणि साप हे जगातील सर्वात विषारी प्राणी आहेत. मात्र, विंचू आणि सापाचे सूप हे  ग्वांगडोंगच्या खास पाककृतीचा एक भाग आहे. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की हे सूप प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते.

    चीनच्या या भागात ही डिश इतकी प्रसिद्ध असूनही, ही डिश तुम्हाला सर्वत्र आढळणार नाही. कारण ही डिश अत्यंत अनुभवी स्वयंपाकीच बनवू शकतो. ज्यांना विंचूपासून विष कसे काढायचे हे माहित आहे. तसेच विंचू आणि साप हाताळण्याचे कौशल्य अललेला कुकच ही डिश बनवतो.

    ही डिश दिसायला टेम्टिंग नसली तरी त्याची चव खूपच अप्रतिम असल्याचा दावा खवय्ये करतात. तज्ज्ञांच्या मते, हे सूप प्यायल्याने त्वचेशी संबंधित आजार दूर होतात आणि रक्तदाबाचा आजारही बरा होतो.