गर्लफ्रेंडसोबत बीचवर एन्जॅाय करत होता युवक; क्षणात होत्याचं नव्हत झालं, शार्कने जीवंत गिळलं!

सोशल मीडियावर केस वाढवणारा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर पोहणाऱ्या एका माणसाला शार्कने गिळल्याचे दिसत आहे.

    फिरायल गेलेल्या पर्यटकावर अनेकदा पक्षी प्राण्यांचा हल्ला (Animal Attack) झाल्याचे अनेक व्हिडिओ (Viral Video) समोर येतात. सध्या इजिप्तमधील एका बीचवरील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अंगाचा थरकाप उडवणारा आहे. इजिप्तच्या बीच रिसॉर्टमध्ये गर्लफ्रेंडसोबत बीचवर एन्जॅाय करताना पोहायला निघालेल्या रशियन पर्यटकाला टायगर शार्कने (Shark Video) हल्ला केल्याची घटना (Shark Attack On Man Video) समोर आली आहे. या घटनेत 23 वर्षीय रशियन पर्यटक Vladimir Popov याचा मृत्यू झाला असून त्याची गर्लफ्रेंड सुखरूप आहे. या घटेनंतर हल्लेखोर शार्कलाही पकडून ठार करण्यात आले आहे.

    काळजाचा ठोका चुकवणारा हो व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर पोहणाऱ्या एका माणसाला शार्कने गिळल्याचे दिसत आहे. अल-जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना इजिप्तमधील हुरघाडा या रेज सी रिसॉर्ट शहराजवळ एक दिवसापूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे.समुद्रकिनाऱ्यावर पोहणाऱ्या एका रशियन पर्यटकाला शार्कने कसे गिळले हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

    हा माणूस रशियन नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. रशियन दूतावासाने या व्यक्तीची ओळख पटवली आहे परंतु, त्याचे नाव उघड केले नाही. द गार्डियनने वृत्त दिले की अधिकाऱ्यांनी शार्कला पकडले आहे. या दुर्मिळ हल्ल्याचे कारण शोधण्यासाठी मंत्रालय तपास करत आहे.

    या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती पाण्यात झुंजत असल्याचे दिसत आहे. प्रथम शार्क त्याच्या भोवती फिरताना दिसतो, नंतर त्याला त्याच्यावर हल्ला करते. व्हिडिओमध्ये लोकांचा आवाज ऐकू येत आहे. काही लोकांनी त्याला वाचवण्याचाही प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. अखेर शार्कसोबतच्या झुंजीत त्या युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.