shocking money matters for a crazy person man blows notes from moving car viral video creates sensation nrvb

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाच्या कारच्या ट्रंकमधून नोटा उडवल्या जात असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ फक्त १५ सेकंदांचा आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण गाडी चालवत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे आणखी एक तरुण तोंडावर कापड बांधून गाडीच्या डिक्कीमधून पैसे रस्त्यावर फेकत होता. हा व्हिडिओ हरियाणातील गुरुग्रामचा आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल आणि प्रसिद्ध होण्यासाठी (Viral And Popular) अनेक तरुण-तरुणी विचित्र गोष्टी करत असल्याचे दररोज पाहायला मिळते. पण अनेक वेळा त्यांची ही कृती त्यांना जड जाते, त्याचा फटका त्यांनाही सहन करावा लागतो. दरम्यान, हरियाणातील गुरुग्राममधील (Haryana Gurugram) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण त्याच्या चालत्या कारमधून चलनी नोटा फेकताना दिसत आहे (A young man is seen throwing currency notes from his moving car). पोलिसांनी या व्हिडिओला दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाच्या कारच्या ट्रंकमधून नोटा उडवल्या जात असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ फक्त १५ सेकंदांचा आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण गाडी चालवत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे आणखी एक तरुण तोंडावर कापड बांधून गाडीच्या डिक्कीमधून पैसे रस्त्यावर फेकत होता. हा व्हिडिओ हरियाणातील गुरुग्रामचा आहे. हा व्हिडीओ पाहून कळत आहे की, हे दृश्य रात्रीचे आहे आणि रस्ताही पूर्णपणे रिकामा दिसत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

एएनआय न्यूज एजन्सीनुसार, एसीपी विकास कौशिक यांनी सांगितले की, पोलिसांना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओद्वारे माहिती मिळाली की, दोन तरुण गोल्फ कोर्स रोडजवळ कारमधून पैसे फेकून चित्रपटाचे दृश्य पुन्हा तयार करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपीची ओळख पटली आहे.