Shocking : रात्री चोरी करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये घुसला, एवढी दारू प्यायला की, सकाळी पोलिसांना तो तिथेच सापडला

चोरट्याच्या मूर्खपणाच्या मोठ्या चर्चा आहेत. तो रेस्टॉरंटमध्ये घुसला. आत जाऊन दारू पिऊन तो तिथेच झोपला.

  चोर कुठेही चोरी करायला जातात (Thieves Go Everywhere To Steal), त्यांचे पहिले काम चोरीला जाणारी वस्तू कोणती आहे यावर लक्ष केंद्रित करणे असते. तिथून किती साहित्य मिळेल? चोरट्याच्या मूर्खपणाच्या मोठ्या चर्चा आहेत. तो रेस्टॉरंटमध्ये घुसला. तिथे जाऊन त्याने अशी चोरी केली, ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. तो आत जाऊन दारू प्यायला आणि मग काय… त्याला तेथेच झोप आली आणि तो तिथेच झोपला.

  रेस्टॉरंट फोडून घुसला होता आत

  सॅम्युअल मुलिगन (Samuel Mulligan) असे या व्यक्तीचे नाव आहे. यूकेमध्ये, तो लास इगुआनास Las Iguanas रेस्टॉरंटमध्ये घुसला. प्रथम त्याने दुकानातून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. पण टिल्स (पैसे ठेवण्याचे यंत्र) तो त्याचे कुलूप तोडू शकला नाही. त्यानंतर तो तेथील रेस्टॉरंटमध्ये बसून दारू प्यायला. तो इतका प्यायला की तो तिथेच झोपी गेला. इथे चोरी करायला आलो होतो आणि जीव वाचवण्यासाठी पळून जावं लागेल याचाही त्याला विसर पडला होता.

  सोफ्यावर अर्धे तोंड उघडलेल्या अवस्थेत पडला होता

  सकाळी जेव्हा कर्मचाऱ्याने रेस्टॉरंट उघडले तेव्हा सॅम्युअल तिथे अर्धे तोंड उघडलेल्या अवस्थेत पडलेला पाहून त्याला आश्चर्य वाटले. तो सोफ्यावर पडला होता. कर्मचाऱ्याने त्याला तिथेच कोंडले आणि त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. नंतर पोलीस त्याला पकडून तिथून घेऊन गेले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गेल्या आठवड्यात अनेक दुकानांतून माल चोरल्याचे समोर आले.

  अनेकदा चोरले होते कपडे

  सॅम्युअलने ८० युरो किमतीचा शर्ट, हुडी जॅकेट आणि दोन महागडे कोट चोरल्याचे वृत्त आहे. न्यायालयाने त्याला १२ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्याला £156 (रु. १५,७००) सेवा अधिभार भरावा लागेल असे सांगितले.