धक्कादायक! स्वत:च्याच लग्नाला नाही पोहोचला आमदार, मग नवरीने घेतला असा निर्णय की…

वधूने FIR दाखल केल्यावर आमदार झोपेतून उठले आणि म्हणाले, यार - आज लग्नाची तारीख होती हे मला कुणीच सांगितले नाही. हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण ओडिशातील जगतसिंगपूर जिल्ह्यातील आहे जिथे सत्ताधारी बिजू जनता दलाचे युवा आमदार आणि विद्यार्थी नेते बिजय शंकर दास यांची कथित वधू सदर पोलीस ठाण्यात पोहोचली होती.

  नवी दिल्ली : ओडिशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वतःच विचार करा जर वर स्वतः लग्नाला पोहोचला नाही तर काय होईल? होय, अशीच काहीशी घटना ओडिशात घडली आहे जिथे एक आमदार (MLA) स्वतःच्याच लग्नाला (Wedding) उपस्थित राहू शकला नाही. यानंतर वधूने (Bride) वराच्या (Groom) विरोधात FIR दाखल केला आहे. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण…

  ओडिशातील अजबगजब प्रकरण

  त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे वधूने FIR दाखल केल्यावर आमदार झोपेतून उठले आणि म्हणाले, यार – आज लग्नाची तारीख होती हे मला कुणीच सांगितले नाही. हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण ओडिशातील जगतसिंगपूर जिल्ह्यातील आहे जिथे सत्ताधारी बिजू जनता दलाचे युवा आमदार आणि विद्यार्थी नेते बिजय शंकर दास यांची कथित वधू सदर पोलीस ठाण्यात पोहोचली होती. या प्रकरणामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

  वर स्वतःच्या लग्नाला पोहोचला नाही, आणि…

  मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने जगतसिंगपूर सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, तिचा ३० वर्षीय आमदार वर लग्नाच्या दिवशीच लग्नाच्या ठिकाणी पोहोचला नाही. या महिलेने आमदार विजय शंकर दास यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. दोघे तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि लग्नासाठी तयार असतानाही ते वेळेवर यायला विसरले.

  वरावर गुन्हा दाखल

  यानंतर आरोपी आमदाराविरुद्ध जगतसिंगपूर सदर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगतसिंगपूर सदन पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रवाह साहू यांनी एफआयआरला दुजोरा दिला आहे. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, महिला आणि आमदाराने विवाह निबंधक कार्यालयात १७ मे रोजी अर्ज केला होता. यानंतर ३० दिवसांचा नियोजित कालावधी उलटूनही शुक्रवारी ही महिला कुटुंबासह लग्नाच्या औपचारिकतेसाठी तेथे पोहोचली, मात्र आमदार बिजय शंकर दास आलेच नाहीत.

  आमदार स्वतःच्या लग्नाला विसरले

  याबाबत आरोपी आमदार बिजय शंकर दास यांच्याशी मीडियाने चर्चा केली असता त्यांनी लग्नाला नकार दिला नाही. उलट आज त्याचेही लग्न आहे, असे कोणी त्यांना सांगितले नाही, असे ते म्हणाले. तथापि, बिजय शंकर यांनी असेही सांगितले की आपण त्या महिलेशी लग्न करणार असून लग्नानंतर ६० दिवसांच्या आत लग्नाची नोंदणी करू शकतो.

  स्पष्टीकरणात आमदार म्हणाले-

  “लग्न नोंदणीसाठी अजून ६० दिवस उरले आहेत. त्यामुळे मी आलो नाही. विवाह निबंधक कार्यालयात जाण्यासाठी मला त्यांनी किंवा इतर कोणीही कळवले नाही.” त्याचवेळी आमदाराने फोन उचलणे बंद केले होते, त्यामुळे तिला मजबुरीने पोलिसांचा आसरा घ्यावा लागला, असे महिलेचे म्हणणे आहे. . अशा परिस्थितीत या प्रकरणाने स्थानिकांना धक्का बसला आहे.