Viral Photo : धक्कादायक! KFC च्या डीशमध्ये महिलेला सापडलं असं काही; फोटो पाहून तुम्हालाही किळस येईल

KFC हॉट विंग्सच्या डब्यात महिलेला पिठात डीप करून तळलेले कुरकुरीत संपूर्ण डोकं सापडलं आहे. या घटनेचा फोटो व्हायरल होतो आहे.

  नॉनव्हेज खाणाऱ्या खवय्यांचा जीव की प्राण म्हणजे चिकन. त्यांना ते खायलाही खूप आवडतं. केएफसी (KFC) ही कंपनी चिकनचे अनेक पदार्थ विकते. खाण्यामध्ये भेसळीच्या बातम्या आपण कितीतरी वेळा ऐकल्या असतील परंतु एका महिलेला नॉनवेज फूड खाताना तिच्या दिशमध्ये जे मिळालं ते बघून तिला धक्काच बसला आबे. तिने तिच्या आयुष्यात असं कधीच पाहिलं न्हवतं जसं तिला या KFC च्या या ऑर्डरमध्ये पहायला मिळालं.

  नेमकं झालं काय?

  ती महिला खूपच हैराण झाली जेव्हा तिला तिने विकत घेतलेल्या फ्रेश केएफसी हॉट विंग्स (KFC Hot Wings) च्या बॉक्समध्ये कोंबडीचं पूर्ण डोकं सापडलं. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये कोंबडीचचं पूर्ण डोकं, डोळे आणि चोच दिसत आहे.

  KFC हॉट विंग्सच्या डब्ब्यात महिलेला पिठात डीप करून तळलेले कुरकुरीत संपूर्ण डोकं सापडलं. केएफसी कस्टमर गॅब्रिएलने ट्विकेनहॅम, साउथेस्ट लंडन येथील केएफसी फेल्थम कडून ऑर्डर केली होती.

  इंस्टाग्रामवर रिव्हू लिहित केला फोटो पोस्ट

  तिने इंस्टाग्रामवर तिच्या KFC च्या जेवणाचा एक धक्कादायक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये लिहिले होते, ‘मला माझ्या हॉट विंग्ज मीलच्या ऑर्डरमध्ये फ्राइड चिकन हेड सापडले. त्यामुळे मला माझ्या जेवणाचा पूर्ण आनंद घेता आला नाही. ओह’ गॅब्रिएलने जस्टईस्टवरील तिच्या रिव्हूमध्ये दोन स्टार दिले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Takeaway Trauma (@takeawaytrauma)