Skeletons of 282 martyrs of 1857 freedom struggle were found in Amritsar

अमृतसरजवळील एका ठिकाणी विहिरीच्या खोदकाम दरम्यान तब्बल 282 सांगाडे आढळून आले आहेत. हे सांगाडे 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामातील शहीद झालेल्या सैनिकांचे असल्याचे प्रा. डॉ. जे.एस. सहरावत यांनी सांगितले. सहरावत हे पंजाब विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत(Skeletons of 282 Martyrs of 1857 freedom struggle were found in Amritsar).

    अमृतसर : अमृतसरजवळील एका ठिकाणी विहिरीच्या खोदकाम दरम्यान तब्बल 282 सांगाडे आढळून आले आहेत. हे सांगाडे 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामातील शहीद झालेल्या सैनिकांचे असल्याचे प्रा. डॉ. जे.एस. सहरावत यांनी सांगितले. सहरावत हे पंजाब विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत(Skeletons of 282 Martyrs of 1857 freedom struggle were found in Amritsar).

    अमृतसरजवळील अजनाला येथे एका धार्मिक वास्तूखाली असणाऱ्या विहिरीच्या खोदकामावेळी हे सांगाडे सापडले. सहरावत म्हणाले, 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात गाई आणि डुक्करांच्या मांसापासून बनविण्यात आलेल्या बंदुकीच्या काडतूसांना इंग्रजी राजवटीत असणाऱ्या भारतीय सैनिकांनी विरोध केला होता. त्यानंतर भारतातील पहिले स्वांतत्र्य संग्राम लढले गेले होते.

    या सांगड्यांचा अभ्यास केल्यानंतर येथे सापडलेली नाणी, पदके, डीएनएचा अभ्यास आणि रेडिओ-कार्बन डेटिंग पद्धत यासर्व गोष्टी ही सांगडे 1857 च्या काळातील सैनिकांची असल्याचे सिद्ध करतात.