skydivers dance in mid air

स्कायडायव्हिंग (Sky Diving) हा साहसप्रेमींसाठी आवडता अनुभव आहे. स्कायडायव्हिंगद्वारे, आपण आकाशात पक्ष्यांप्रमाणे उडू शकतो आणि आपल्या डोळ्यांनी खाली जग पाहू शकतो. इंटरनेटवर स्कायडायव्हिंगचे अनेक व्हिडिओ (Sky Diving Video) उपलब्ध आहेत. पण आकाशात डान्स केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे.

  सोशल मीडियावर (Social Media) काहीतरी हटके केलेल्या वेगवेगळ्या स्टंटचे व्हिडिओ तुम्ही भरपूर पाहिले असतील. पण सध्या जो एक व्हिडिओ खूप व्हायरल (Viral Video) होतोय तो पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. आकाशात अगदी पक्ष्यांसारखं उडण्याचा अनुभव घेण्यासाठी लोक स्कायडायव्हिंग (Sky Diving) करतात. पण तुम्ही कधी वर उंच आकाशात डान्स (Dance In The Air) केलेला बघितला आहे का ?

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mairis Laiva (@mairis_l)

  खुल्या आकाशात पक्ष्यांप्रमाणे उडता येईल, असे अनेकांचं स्वप्न असतं. स्कायडायव्हिंग लोकांना हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करते. त्यामुळे स्कायडायव्हिंग हा साहसप्रेमींसाठी आवडता अनुभव आहे. स्कायडायव्हिंगद्वारे, आपण आकाशात पक्ष्यांप्रमाणे उडू शकतो आणि आपल्या डोळ्यांनी खाली जग पाहू शकतो. इंटरनेटवर स्कायडायव्हिंगचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. पण आकाशात डान्स केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  खरंतर, इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही स्कायडायव्हर्स जमिनीपासून कित्येक मीटर उंचीवर हवेत डान्स करताना दिसत आहे. हा थरारक व्हिडीओ यूजर्सना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मारिस लिवाने तिच्या mairis_l या अकाउंटवर गेल्या महिन्यात शेअर केला होता. मारिस हा स्कायडायव्हिंग प्रशिक्षक आहे.