मौज म्हणून स्मोकी बिस्किटं खाल्ली, अचानक वेदननं विव्हळला लहान मुलगा, काही वेळातचं मृत्यू!

बिस्किट खाताचं त्याला तिव्र वेदना झाल्या. तातडीने त्याला रुग्णालयाक दाखल करण्यात आलं पण स्मोक्ड बिस्किटे खाल्ल्याने मुलाची तब्येत बिघडली आणि त्याला जीव गमवावा लागला, असा दावा केला जात आहे.

  लहान मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी पालक त्यांना हवं ते देतात. मग ते खाण्यापिण्याचे लाड असोत की वस्तूचे. मात्र अशाप्रकारे आपल्या मुलाचा लाड पुरवणं पालकाला महागात पडलं आहे. एका मुलाने स्मोकी बिस्कीट (Smokey Biscuits viral video) खाल्ली .मात्र ती खाताच मुलाची तब्येत बिघडली आणि त्याला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना सध्या समोर आली आहे. हृदय पिळवटून टाकणारा या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

  नेमका काय प्रकार

  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की,  लहान मूल एका स्टॉलवर स्मोकी बिस्कीट खाताना दिसत आहे. मुलाने स्मोकी प्यायल्याबरोबर अचानक पोटात दुखू लागते आणि वेदनेने तडफडू लागतो. मुलाचे पालकही त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जातात. मात्र, तिथे त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. स्मोक्ड बिस्किटे खाल्ल्याने मुलाची तब्येत बिघडली आणि त्याला जीव गमवावा लागला, असा दावा केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ X वर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

  सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर

  अनेक यूजर्सनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून लोकांना अलर्ट केले आहे. सर्व पालकांनी आपल्या मुलांना अशी स्मोक्ड बिस्किट पेये पिण्यापासून थांबवावे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या जीवाची काळजी असेल तर त्यांना अशा पेयांपासून दूर ठेवा.

  स्मोकी बिस्कीट शरीरीस घातक

  एका वापरकर्त्याने दावा केला आहे की स्मोकी बिस्कीटांसारख्या पेयांमध्ये -196 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केलेले द्रव नायट्रोजन असते, ज्यामुळे पोट फुटते आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

  दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की द्रव नायट्रोजन पिल्याने मृत्यू होतो. गुरुग्राममधील एका रेस्टॉरंटमध्ये अशाच प्रकारचे माऊथ फ्रेशनर वापरले गेले होते जेथे पाच लोकांना अन्नातून रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. वापरकर्त्यांना या प्रकारच्या स्मोकी शीतपेयेपासून सावध राहण्यास सांगितले