ब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण

ब्रिटनच्या ननथॉर्प येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय स्टेफनी नावाच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या स्पर्मच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला आहे. रिपोर्टनुसार, स्टेफनीचा तिच्या नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. तिला या पतीपासून एक मुलगा आहे. या महिलेला आणखी एक मूल हवं होतं.

    नवी दिल्ली : ब्रिटनची (Britain) रहिवासी असलेल्या एका महिलेने (Woman) ऑनलाइन (Online) ऑर्डर केलेल्या स्पर्म (Sperm) पासून आई झाली आहे. आता या बाळाला ऑनलाइन बेबी (Online Baby) म्हटलं जात आहे. हैराण करणारी बाब अशी की, महिलेने ऑनलाइन स्पर्म ऑर्डर केले होते यानंतर इनसेमिनेशन किटच्या मदतीने तिने या स्पर्मचा वापर केला आहे. महिलेला पहिल्याच प्रयत्नात गर्भधारणा झाली आणि आता तिने एका मुलीला जन्म दिला आहे.

    एका रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या ननथॉर्प येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय स्टेफनी नावाच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या स्पर्मच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला आहे. रिपोर्टनुसार, स्टेफनीचा तिच्या नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. तिला या पतीपासून एक मुलगा आहे. या महिलेला आणखी एक मूल हवं होतं पण, तिला दुसऱ्या कुणाशीही संबंध ठेवायचे नव्हते. यानंतर तिने ऑनलाइन स्पर्म ऑर्डर करण्याचा निर्णय घेतला.

    रिपोर्टनुसार, महिलेकडे अधिक पैसे नव्हते यामुळे तिला रुग्णालयात जाऊन आयव्हीएफ करणं शक्य नव्हतं. या महिलेने सर्वप्रथम ऑनलाइन स्पर्म डोनेशनशी संबंधित सर्व माहिती संकलित केली आणि याबाबत तिने आपल्या काही मित्रांशीही सल्ला-मसलत केली. अखेरीस महिलेने एका बेबी ॲपच्या माध्यमातून स्पर्म ऑर्डर केले आणि त्यानंतर तिने एक इनसेमिनेशन किट मागवलं.

    स्पर्म डोनर स्वत: तिच्या घरी आला आणि तिला स्पर्म देऊन गेला. यानंतर महिलेने इनसेमिनेशन किटच्या मदतीने या स्पर्मचा वापर केला त्यानंतर महिलेला पहिल्या प्रयत्नाच गर्भधारणा झाली. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही आणि ही एक प्रकारे ऑनलाइन बेबी असल्याचं या महिलेने म्हटलं आहे.