व्वा क्या बात है, इतकं सुंदर जाळ विणताना कोळ्याला पाहिलंय कधी? सोशल मीडियावर Video Viral

व्हायरल होत असलेल्या या अनोख्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक कोळी त्याचे जाळे विणताना दिसत आहे. हा कोळी हे काम इतक्या अप्रतिम पद्धतीने करत आहे की तुम्हीही थक्क व्हाल.

    Spider weaving : तुम्ही अनेकदा कोळ्याचे जाळे कुठेतरी पडलेले पाहिले असेल. या जाळ्याचा पोत पाहता एखाद्या कलाकाराने या जाळ्यांमधून आपली कलाकृती कोरली आहे, असे वाटते. पण तुम्ही कधी कोळीचे जाळे विणताना पाहिले आहे का? व्हायरल (Viral Video) होत असलेला हा अप्रतिम व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ खरा आहे. कोळ्याला जाळे विणताना पाहून तुमची नजर व्हिडिओवरून हटणार नाही. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांनाही खूप आराम मिळेल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral on Social media) होत आहे.

    आता सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक छोटा कोळी त्याचे सुंदर जाळे विणत आहे. व्हिडिओमध्ये एक छोटा कोळी न थांबता अतिशय वेगाने जाळे विणताना दिसत आहे. काही मिनिटांत, तो हळू हळू त्याचे सुंदर जाळे तयार करतो. या चिमुकल्या कीटकाचा इतका सुंदर आकार पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल.

    काही मिनिटांमध्ये विणलं सुंदर जाळं

    व्हिडिओमध्ये, एक लहान कोळी त्याचे जाळे (Spider web video) विणताना दिसत आहे, जे पाहणे खूप आनंददायक आहे. व्हिडिओ 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ट्विटर अकाऊंटवर ही क्लिप शेअर करण्यात आली आहे. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडिओला 13 हजारांहून अधिक सोशल मीडिया यूजर्सनी लाइक केले आहे, तर या व्हिडिओला आतापर्यंत 1869 रिट्विटही आले आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमचाही दिवस आनंदात जाईल.