तीन कोब्रांनी एकमेकांना दाखविला फणा; व्हिडिओ पाहून हाडंही चळचळा कापतील

या व्हिडिओमध्ये तीन किंग कोब्रा (Three King Kobra) एका ठिकाणी एकमेकांकडे बघत आहेत. अचानक ते एकमेकांसमोर येतात.

  सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. असे व्हिडिओ पाहून लोक हसतात. पण असे अनेक व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर माणसाची हाडं चळचळा कापतात. म्हणजे मित्रांनो… असे व्हिडिओ पाहून माणूस घाबरतो. कारण मी हे यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. असाच एक व्हिडिओ किंग कोब्रा (King Cobra) या जगातील सर्वात धोकादायक सापाचा समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तीन किंग कोब्रा एका ठिकाणी एकमेकांकडे बघत आहेत. अचानक ते एकमेकांसमोर येतात.

  मग काय होते?

  या व्हिडिओमध्ये तीन साप फणा उंचावून एकमेकांकडे पाहत असल्याचे दिसत आहे. तिन्ही नाग अतिशय शांत मुद्रेत एकत्र दिसत आहेत. अनेकांनी तो पाहिला आणि त्यावर प्रतिक्रिया दिल्या. हा व्हिडिओ जंगली भागातील असल्याचे दिसते. मात्र, त्याबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही.

  हा आहे कोब्राचा व्हिडिओ

   

  View this post on Instagram

   

  A post shared by SACHIN AWASTHI (@helicopter_yatra_)

  सापांची मिटिंग सुरू आहे का?

  हे साप पाहिल्यानंतर युजर्सनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. हे पाहून जणू सापांची खास मिटिंग होत असल्याचे काहींनी सांगितले. एका यूजरने लिहिले की, ही राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे. तिघांनी एकमेकांवर हल्ला केला नाही, उलट तिन्ही किंग कोब्रा (King Cobra) असेच एकमेकांकडे बघत राहिले.