स्विगी डिलिव्हरी बॉयनं सामान घरी पोहोचवलं, पण घराच्या बाहेर दारातच केलं ‘असं’ काम की….VIDEO व्हायरल!

गुरुग्राममधील एका फ्लॅटमध्ये काही वस्तू पोहोचवायला आल्यावर स्विगी इन्स्टामार्ट डिलिव्हरी मॅनने दाराबाहेर ठेवलेले महागडे शूज चोरुन घेऊन गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

  आजकाल ऑनलाईन शॅापिंगच्या (Online Shopping) युगात लोक अनेक छोट्या छोट्या वस्तू ऑर्डर करतात. जेवणाबरोबर आता गृहपयोगी वस्तूही ऑनलाईन ऑर्डर करण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, अशावेळी कधी डिलिव्हरी बॅायकडून अनेकदा असं काही घडतं तो चर्चेचा विषय ठरतो. सध्या असाच एक डिलिव्हरी बॅायचा किस्सा इंटरनेवर व्हायरल झाला आहे. बघुया नेमकं काय केलंय या डिलिव्हरी बॅायनं.

  डिलिव्हरी बॅायने चोरले ग्राहकाचे शूज

  मिळालेल्या माहितीनुसार,  9 एप्रिल रोजी गुरुग्राममधील फ्लॅटमध्ये एकाने स्विगी इन्स्टामार्ट वरुन काही वस्तूंची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. काही वेळात डिलिव्हरी बॅाय ग्राहकाचं सामान घेऊन आला.  (Delivery Boy Steals shoes) त्याने ऑर्डर केलेलंं सामान ग्राहकाला दिलं. पण त्याने घराबाहेर ठेवलेल्या महागड्या शूजवर डल्ला मारला. काही कळायच्या आत तो शूज चोरून घेऊन गेला. डिलिव्हरी बॅायचं हे कृत्य इंटरनेवर व्हायरल होताच. लोक संताप व्यक्त करत आहेत.

  डिलिव्हरी बॅायने केली चोरी

  या घटनेचा सिसिटिव्ही फुटेज समोर आलं असून. त्यानुसार, स्विगीचा डिलिव्हरी मॅन फ्लॅटच्या बाहेर पोहोचतो आणि बेल वाजवतो. दार उघडेपर्यंत तो खाली पडलेल्या बुटांकडे बघत राहतो. यानंतर एक महिला येऊन ऑर्डर घेते. मग दार बंद होते पण ती व्यक्ती तिथेच उभी असते. यानंतर, तो डोक्याभोवती गुंडाळलेला टॉवेल काढतो आणि त्याने चेहरा पुसतो आणि काही पायऱ्या उतरतो आणि डावीकडे उजवीकडे पाहतो. मग तो परत येतो, खाली ठेवलेले महागडे नायके शूज उचलतो, टॉवेलमध्ये गुंडाळतो आणि निघून जातो.

  रोहित नावाच्या व्यक्तीने या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने असेही लिहिले आहे की – स्विगीच्या डिलिव्हरी मॅनने माझ्या मित्राचे महागडे नायके शूज काढून घेतले आणि स्विगी मला त्याचा संपर्क क्रमांकही देत ​​नाही. तक्रारीचा चॅट स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. ज्याला कंपनीने प्रतिसाद दिला नाही.

  मात्र, त्या व्यक्तीच्या सोशल मीडिया पोस्टनंतर स्विगीने लगेच प्रतिक्रिया दिली. स्विगीने लिहिले – ‘आम्ही आमच्या डिलिव्हरी पार्टनरकडून चांगल्या अपेक्षा करतो. DM वर आमच्याशी संपर्क साधा, जेणेकरून आम्ही तुम्हाला अधिक चांगली मदत करू शकू.

  त्या व्यक्तीच्या पोस्टवर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या. एका युझरने लिहिले – त्याच्या Nike शूजची किंमत परत करा. ते स्वस्त नाहीत आणि त्यांना अशा प्रकारे गमावणे काही विनोद नाही. दुसऱ्याने लिहिले – अशा प्रकारे घरातून कोणतीही वस्तू चोरीला जाऊ शकते. अनेकांनी तक्रार चॅटबाबत सांगितले की – स्विगीने प्रतिक्रिया द्यायला हवी होती. हे खूप निराशाजनक आहे.