swiggy delivery boy

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक डिलिव्हरी बॉय (Swiggy Delivery Boy Video) भर पावसात सायकलवरून फूड डिलिव्हरी करण्यासाठी जाताना दिसत आहे.

    सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक डिलिव्हरी बॉय (Swiggy Delivery Boy Video) भर पावसात सायकलवरून फूड डिलिव्हरी करण्यासाठी जाताना दिसत आहे.

    प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी संकटे आणि आव्हाने येत असतात. काहीजण या संकटावर मात करतात तर काही रडत बसतात. काही जण प्रामाणिकपणे दोन वेळेच्या जेवणासाठी मेहनत करताना दिसतात. स्विगी बॉयच्या या व्हिडिओमध्ये त्याच्या जिद्दीचा प्रत्यय येत आहे.


    @umda_panktiyan नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. स्विगी डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसामध्ये सायकलवरून फूड डिलिव्हरी करताना दिसत आहे. डिलिव्हरीचा हा व्हिडिओ पाहून अनेक जण प्रेरित झाले आहेत. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर लक्ष्य गाठता येते, यावर या स्विगी बॉयचा विश्वास असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ  अनेक युजर्सनी कमेंट करत स्विगी डिलिव्हरी बॉयचं कौतुक केलं आहे.