Technical Lochya
प्रतिकात्मक फोटो

तांत्रिक बिघाडामुळे (Technical Lochya) एटीएममध्ये जास्तीची रोकड येत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, एटीएमच्या ट्रेमध्ये १०० रुपयांच्या नोटा चुकून ५०० रुपयांच्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या.

    नागपूर : महाराष्ट्रातील (Maharashtra) नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) एका व्यक्तीने एटीएममधून ५०० रुपये काढण्याचा (Withdrawal 500 Rupees From ATM) प्रयत्न केला, मात्र त्याऐवजी ५०० रुपयांच्या पाच नोटा मशीनमधून आल्याने तो आश्चर्यचकित झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच (Viral News) एटीएममधून पैसे काढण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा लागली. त्या व्यक्तीने पुन्हा तीच कृती केली आणि ५०० रुपये काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पुन्हा २,५०० रुपये मिळाले.

    नागपूर शहरापासून ३० किमी अंतरावर असलेल्या खापरखेडा शहरातील (Khaperkheda City) एका खासगी बँकेच्या एटीएममध्ये (Private Bank ATM) बुधवारी ही घटना घडली. ही बातमी संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि एटीएम केंद्राबाहेर पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी झाली. खापरखेडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने (Khaperkheda Police Officer) सांगितले की, “एका बँक ग्राहकाने स्थानिक पोलिसांना माहिती दिली आणि घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी एटीएम केंद्र बंद केले आणि बँकेला याबाबत माहिती दिली.”

    तांत्रिक बिघाडामुळे (Technical Lochya) एटीएममध्ये जास्तीची रोकड येत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, एटीएमच्या ट्रेमध्ये १०० रुपयांच्या नोटा चुकून ५०० रुपयांच्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.