७१ हजारांचा फुड कर्मचाऱ्यांना ऑर्डर करणारा बॉस; असा बॉस सगळ्यांना मिळो

    बॉस हा शब्द ऐकली की डोक्यात विचार येतो तो जास्त काम करुन घेणे वेगळेवर घरी न सोडने इत्यादी गोष्टीच चक्र डोक्यात फिरल्याशिवाय राहत नाही. जगातील कुठल्याही कर्मचाऱ्यांना आपला बॉस खुप आवडीचा असं तुरळकचं. पण पुण्याच्या एका बॉसची सध्या सोशल मिडीयावर हवा झाली आहे. एका कंपनीच्या बॉसने स्वतच्या कर्मचाऱ्यांसाठी दोन चार हजारांचं नाही तर तब्बल ७१ हजारांचा स्विगीवर फुड ऑर्डर करत सगळ्या बॉसचा विक्रमचं मोडला आहे म्हणायचा. असा बॉस सगळ्यांना मिळवा असा वाटत असेल, कोणाला नको मला तरी मिळू दे, अस तुम्हाला नक्की वाटत असेल.

    ७१ हजारांच्या या फुड ऑर्डरमध्ये या बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बर्गर आणि फ्राइज मागवले होते. तर हा ७१ हजारांचा ऑर्डर एकाचं वेळी केलेला ऑर्डर नसुन २०२२ या वर्षभरात आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल ७१ हजारांचं जेवण पार्टी दिली आहे.

    स्विगीने आपला २०२२ या वर्षातील आपला वार्षिक अहवाल सादर केला आहे. तरी या अहवालातून ही महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. ७१ हजारांचा फुड ऑर्डर करणारा हा व्यक्ती पुण्यातील एका खासगी कंपनीचा मालक आहे. तसेच देशातील सर्वाधिक किमतीचा स्वीगीवर फुड ऑर्डर करणार हा व्यक्ती देशातील दुसरा व्यक्ती आहे. सर्वाधिक स्वीगी फुड ऑर्डर करणार व्यक्ती बंगळूरुचा असुन त्याने स्वीगीवर वर्षभरात तब्बल ७५ हजारांचं जेवण मागवलं आहे.