the bridegroom brought the procession on jcb bride was surprised pictures went viral on social media it happens only in india nrvb

गुजरातमधील (Gujarat) नवसारी (Navsari) जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील (Chikhali) कालियारी गावातून (Kaliyari Village) हे प्रकरण समोर आले आहे. हा अनोखा विवाह पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

    नवी दिल्ली : लग्न (Wedding) हा प्रत्येक वधू-वरांसाठी (Bride-Groom) सर्वात खास क्षण असतो. हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करतात. तुम्ही अनेकदा लग्नात वराला घोड्यावर (On Horse) बसताना किंवा गाडीतून (By Car) येताना गाताना आणि नाचताना पाहिलं असेल. पण तुम्ही कधी स्वत:च्या लग्नात JCB वर आलेल्या वराला पाहिले आहे का?

    वास्तविक, हे अनोखे प्रकरण सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे. गुजरातमधील (Gujarat) नवसारी (Navsari) जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील (Chikhali) कालियारी गावातून (Kaliyari Village) हे प्रकरण समोर आले आहे. हा अनोखा विवाह पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. कारण या लग्नात वराने घोडी किंवा गाडीने येण्याऐवजी जेसीबीवर चढून मिरवणूक आणली होती. या लग्नाच्या मिरवणुकीचे दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

    विशेष म्हणजे त्याचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. जेसीबी मशिनमधून लग्नाची मिरवणूक आणण्यासाठी फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली होती. ढोल-ताशे आणि डीजेच्या तालावर गात आणि नाचत ही मिरवणूक वधूच्या घरी पोहोचली. जेसीबीमध्ये बसून वऱ्हाडी लग्नस्थळी पोहोचले, तेव्हा हे दृश्य पाहून वधू-वरा कडील वऱ्हाडी मंडळी आश्चर्यचकित झाली.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, वराला त्याच्या लग्नासाठी जेसीबीमधून येण्याची कल्पना यूट्यूबवरून आली. वराने सांगितले की प्रत्येकजण गाडी घेऊन येतो… मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून जेसीबी आणला. मी YouTube वर हे कसे करायचे ते पाहिले आणि मी तेच केले.