7 वर्षांनी जोडप्यांचे पोलिस ठाण्यात झाले लग्न; मुले झाली वऱ्हाडी, पोलिसांनी केले कन्यादान

राजस्थानच्या जोधपूरमध्ये पोलिस ठाण्यात दोन जोडप्यांचे धुमधडाक्यात लग्न करण्यात आले. विशेष म्हणजे, तब्बल सात वर्षांनी हे दोन जोडपे लग्न बंधनात अडकले. तसेच त्यांची मुले देखील या लग्नाला उपस्थित होती. या जोडप्यांचे पोलिसांनी कन्यादान केले. लग्नादरम्यान पोलिस स्टेशनबाहेर वाजत गाजत वऱ्हाडी मंडळी जमली होती. पोलिसांच्या समोरच सप्तपदी घेण्यात आले(The couple got married at the police station after 7 years).

    जयपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये पोलिस ठाण्यात दोन जोडप्यांचे धुमधडाक्यात लग्न करण्यात आले. विशेष म्हणजे, तब्बल सात वर्षांनी हे दोन जोडपे लग्न बंधनात अडकले. तसेच त्यांची मुले देखील या लग्नाला उपस्थित होती. या जोडप्यांचे पोलिसांनी कन्यादान केले. लग्नादरम्यान पोलिस स्टेशनबाहेर वाजत गाजत वऱ्हाडी मंडळी जमली होती. पोलिसांच्या समोरच सप्तपदी घेण्यात आले(The couple got married at the police station after 7 years).

    दोन जोडप्यांमध्ये एका छोट्याशा कारणावरून वाद झाला होता. पुढे तो वाद टोकाला गेला आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना समजावले. त्यांच्यातील वाद मिटवला आणि पुन्हा एकदा पोलिस ठाण्यातच त्याचा विवाह उरकला. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये दोन कुटुंबीयांनी आपल्या मुलींचे लग्न केले होते.

    देवतडा येथे राहणाऱ्या कंवराराम यांचा मुलगा गिरधारीराम याचे लग्न अरटिया खुर्द येथील जीवनरामची मुलगी उषा हिच्यासोबत झाले. उषाचा भाऊ विशनारामसोबत गिरधारीरामची बहीण धारू हिचे लग्न देखील तेव्हाच झाले. काही कौटुंबिक वादामुळे दोन्ही कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाला. एक वर्षापूर्वी उषा आपल्या घरी परत आली तर धारू देखील तिच्या घरी निघून गेली.

    हे प्रकरण पुढे पोलिसांत गेले. त्यावेळी पोलिसांनी दोन्ही जोडपी आणि त्यांच्या कुटुंबीयांना समजावलं. मुलांच्या भविष्यासाठी एकत्र राहणं किती गरजेचं आहे ते सांगितले. यानंतर दोन्ही कुटुंब तयार झाली आणि पुन्हा एकदा सात वर्षांनी त्यांचे लग्न लावण्यात आले. या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.