The customers who come to the restaurant have to lick the wall with the meal

जगात अनेक अशी वेगवेगळी ठिकाणं आहेत, जिथे त्यांचे स्वतःचे नियम आणि कायदे आहेत. काही ठिकाणी तुम्हाला जेवणासोबत शिव्या दिल्या जातात, तर कुठे उभा राहूनच जेवण करावे लागते. मात्र असे एक रेस्टॉरंट आहे, जिथे येणाऱ्या लोकांना जेवणासोबतच तिथे असलेली भिंत चाटण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. हे रेस्टॉरंट अमेरिकेच्या ऍरिझोना राज्यातील स्कॉट्सडेलमध्ये आहे(The customers who come to the restaurant have to lick the wall with the meal).

    जगात अनेक अशी वेगवेगळी ठिकाणं आहेत, जिथे त्यांचे स्वतःचे नियम आणि कायदे आहेत. काही ठिकाणी तुम्हाला जेवणासोबत शिव्या दिल्या जातात, तर कुठे उभा राहूनच जेवण करावे लागते. मात्र असे एक रेस्टॉरंट आहे, जिथे येणाऱ्या लोकांना जेवणासोबतच तिथे असलेली भिंत चाटण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. हे रेस्टॉरंट अमेरिकेच्या ऍरिझोना राज्यातील स्कॉट्सडेलमध्ये आहे(The customers who come to the restaurant have to Lick The Wall with the meal).

    इथे बांधण्यात आलेल्या ‘द मिशन’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या लोकांना जेवणासोबतच आपल्या जीभेने रेस्टॉरंटची भिंतही चाटून टेस्ट करावी लागते. द मिशन रेस्टॉरंटमधील ही स्वादिष्ट भिंत गेल्या 17 वर्षांपासून बांधली गेली आहे. इथे येणारे लोक एकदा तरी ही भिंत जिभेने चाटून बघतात. वास्तविक ही भिंत पिंक हिमालयन सॉल्ट म्हणजेच गुलाबी मीठापासून बनवली आहे. यामुळेच लोकांना त्याची चव घेण्याची इच्छा होते आणि रेस्टॉरंटचे कर्मचारीही ग्राहकांना असे करण्यापासून थांबवत नाहीत.

    ओल्ड टाउन स्कॉट्सडेलमध्ये स्थित हे रेस्टॉरंट केवळ आपल्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठीच प्रसिद्ध नाही, तर ते या खास भिंतीसाठी देखील प्रसिद्ध आहे. माहितीनुसार, ही भिंत हेडशेफने येथे आणली होती, जी आता लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. इथे येणारे अनेक लोक ही भिंत चाटतात, अशात ते किती रोगांचे कारण बनू शकते.

    परंतु, रेस्टॉरंटचे कर्मचारी सांगतात की, ही भिंत हिमालयीन रॉक सॉल्टपासून बनलेली आहे, ज्यामध्ये स्वतःच स्वच्छतेचे गुणधर्म आहेत आणि यामुळे यातून कोणालाही कोणताही रोग होत नाही. असे असले तरी कर्मचाऱ्यांकडून दररोज भिंतीची स्वच्छता केली जाते.