वर जाणाऱ्या स्वयंचलित जिन्यानं घेतला रिवर्स गेयर, एकमेकांच्या अंगावर पडेलत लोकं, पाहा व्हिडिओ!

दक्षिण कोरिया येथील सरकत्या जिन्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रकता जिना अचानक उलटा धावू लागला.क ो आ

    आजकाल छोट्या मोठ्या शहरात सगळीकडे एस्केलेटर म्हणजे स्वयंचलित जिने (Escalator ) पाहायला मिळतात. याचा वापर लहान मुलं, महिला, वृद्ध लोकांपासून सगळे जण करतात. या स्वयंचलित जिन्याचा वापर करणं ही फार मजशीर असत. मात्र, कधी विचार केलाय का? लवकर पोहचण्यासाठी वापर करण्यात हा स्वयंचलित जिना जर उलटा धावू लागला तर काय होणार? सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होताआ आहे. वर जाणाका जिना अचानक उलटा चालू लागला. त्यामळे त्या जिन्यावर चढलेले लोक अचानक मागे फेकले गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    दक्षिण कोरिया मधील व्हिडिओ

    मेट्रो, मॉल असो की एखादे मोठे हॉटेल आजकाल सरकते जिने जवळपास सर्वच ठिकाणी पाहायला मिळतात. सुरुवातीला या सरकत्या जिन्यांवर पाय ठेवायलाही घाबरणारी मंडळी. आता चांगलीच सरावली आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच नागरिक सरकत्या जिन्याचा उपलब्धतेनुसार लाभ घेतात. त्यामुळे जिन्यांवरुन चालण्याचा त्रास वाचतो. खास करुन गर्भवती महिला, वृद्ध लोक आणि लहान मुले यांना त्याचा फायदा अधिक. पण हाच सरकता जिना उलटा फिरला तर?

    दक्षिण कोरिया येथील सरकत्या जिन्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात असेच घडले आहे. सरकता जिना अचानक उलटा धावू लागला. त्यामळे झाले असे की, सरकत्या जिन्यावर चढलेले लोक अचानक मागे फेकले गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात जिन्यावरील लोक पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसत आहेत. या घटनेत 14 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.