उन्हाचा तडाखा वाढला, रिक्षाचालकाने केला अनोखा जुगाड; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये रिक्षाचालकाने उन्हापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल वापरली आहे.

    सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. राज्यभरामध्ये नेहमीपेक्षा यंदा तापमानचा पारा जास्तच चढला आहे. अनेक ठिकाणी 40 अंशाहून अधिक तापमान नोंदवण्यात आले आहे. या कडक उन्हापासून वाचण्यासाठी सगळेजण काही ना काही उपाय योजना करत आहेत. मात्र घराबाहेर पडून रस्त्यावर काम करणाऱ्या व्यक्तींनी देखील उन्हापासून संरक्षण करण्यासाठी खास उपाय केले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये रिक्षाचालकाने उन्हापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल वापरली आहे.

    चारचाकीमध्ये उन्हापासून वाचण्यासाठी एसीची सुविधा असते. मात्र तीन चाकीमध्ये दोन्ही बाजूने ऊन लागते. यासाठी एका ऑटो रिक्षाचालकाने काही पद्धत वापरली आहे. सोशल मीडियावर या रिक्षाचालकाचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एक पिवळ्या रंगाची एक ऑटो रिक्षा आपल्याला दिसत आहे. मात्र या ऑटो रिक्षाचे एक वेगळेपण म्हणजे या ऑटो रिक्षाच्या चालकाने त्याच्या ऑटो रिक्षामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी चक्क गवत निर्माण केले आहे. त्यासाठी त्याने काही पोत्यांचा वापर केला आहे. ती पोती ऑटो रिक्षाला व्यवस्थित बांधून त्यातून लहान लहान गवत निर्मिती केली आहे. या गवताने ऑटो रिक्षाच्या आतमध्ये बसलेल्या प्रवाशांना गरमीपासून काही प्रमाणात आराम मिळेल आणि थंडवा मिळेल.

    नेटकऱ्यांना रिक्षाचालकाने केलेला हा जुगाड पसंतीस पडला आहे. @shetivadi या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. या आधीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोख्या सजवलेल्या आणि जुगाड केलेल्या ऑटो रिक्षा चालकाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये आता उन्हापासून वाचण्यासाठी केलेली उपाययोजना सर्वांना आवडत आहे.