जगण्याची उमेद देणारा व्हिडिओ : फिजिओथेरपीदरम्यान नर्सने लकवा झालेल्या रुग्णाकडून करून घेतला असा डान्स; तुम्हीही म्हणाल मन उडू उडू झालं

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक परिचारिका लकवा झालेल्या रुग्णाला (Paralytic Patient) थेरपी देताना दिसत आहे. पण हे फिजिओथेरपी सत्र तिच्या पेशंटसाठी थोडं मजेदार बनवण्याचा ती प्रयत्न करते आणि तोच क्षण कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आहे.

    सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडिओ समोर येतात, जे माणसाच्या हृदयाला भिडतात. हे व्हायरल झालेले व्हिडिओ (Viral Video) पाहून मन भावूक होते तर कधी डोळ्यात आनंदाश्रू येतात. पुन्हा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक परिचारिका अर्धांगवायूच्या रुग्णाला (Paralytic Patient) थेरपी देताना दिसत आहे. पण हे फिजिओथेरपी सत्र तिच्या पेशंटसाठी थोडं मजेदार बनवण्याचा ती प्रयत्न करते आणि तोच क्षण कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आहे. पेशंटच्या चेहऱ्यावर हसू येतं पण बघणारेही आनंदी झाल्याशिवाय राहू शकत नाहीत.

    आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे व्हिडिओ

    IPS अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ते लिहितात, ‘परिचारिकेने हुशारीने नाचताना लकवा झालेल्या रुग्णाकडून फिजिओथेरपीचे व्यायाम करून घेतले, उमेद आणि उत्साह भरला. रुग्ण बरे झाल्यावर सर्व डॉक्टरांचे आभार मानतात. पण परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीसाठी ‘धन्यवाद’ हा एक अतिशय छोटा शब्द आहे.’

    पहा व्हिडिओ :

    हे सुद्धा वाचा
    • शाहरुख

      दोन्ही परिचारिकाही झाल्या आनंदी

      बेडवर पडलेल्या व्यक्तीला लकवा झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या शरीराचा एक भाग काम करत नाही. पण नर्स त्याच्यासमोर नाचते आणि त्यालाही नाचायला सांगते तेव्हा तो खूश होतो. त्याचा ताण कमी होतो. तो अगदी उजव्या हाताने लकवा झालेला हात उचलतो आणि उसासे टाकतो. त्याचे धाडस आणि उत्साह पाहून परिचारिकांनाही आनंद झाला आणि त्याचे कौतुक केले.

      हा व्हिडिओ जगण्याची उमेद देतो

      युजर्सनी परिचारिकांचे खूप कौतुक केले आणि डॉक्टरांसह लोकांना त्यांच्या कामाचे कौतुक करण्याची विनंती केली. एका युजरने लिहिले की, ‘रुग्णासोबत नर्सचे अशा प्रकारचे सहकार्य रुग्णामध्ये नवीन चैतन्य आणि उत्साह भरते, ज्यामुळे रुग्ण बरा होण्यासाठी मानसिकदृष्ट्या मजबूत होतो. खरंच ही मानवतेची खरी सेवक आहे. आणखी एका युजरने तिच्या विचाराला सलाम केला आहे.