truly horrible heart attack took his life again while walking in the corridor the student suddenly got cardiac arrest died on the spot video viral nrvb

हैदराबाद : गेल्या काही महिन्यांपासून अशी अनेक प्रकरणे सातत्याने पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. ज्यामध्ये कधी चालताना (Walking) तर कधी नाचताना (Dancing) हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) लोकांचा मृत्यू (Death) होत आहे. जे खूप आश्चर्यकारक आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे या घटनांमध्ये अल्पवयीन मुले आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जे कार्डियाक अरेस्टचे (Cardiac Arrest) बळी ठरले आहेत.

आता अशीच एक वेदनादायक घटना हैदराबादमधून (Hydrabad) समोर आली आहे. जिथे शाळेतील एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. सूर्या रेड्डी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, हे खूप दुःखद आहे, सीएमआर अभियांत्रिकी महाविद्यालयातील बीटेक प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हा विद्यार्थी हृदयविकाराच्या झटक्याने इमारतीत फिरत असताना अचानक कोसळला. विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांनी त्याला ताबडतोब हैदराबादच्या बाहेरील मेडचल येथील रुग्णालयात हलवले, पण त्याला वाचवता आले नाही.

नुकतेच जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत अँकरिंग परफॉर्मन्स देण्यापूर्वी एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला होता. हे प्रकरण मध्य प्रदेशातून समोर आले होते. यानंतर शाळेत शोककळा पसरली. अशी आश्चर्यकारक प्रकरणे रोज समोर येत आहेत.