लग्नातील पाहुण्यांसाठी अजब सूचना; लग्नपत्रिका तुफान व्हायरल

सध्या सोशल मीडिया एक पत्रिका तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये पत्रिकेवर येणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी खास सुचना टाकण्यात आली आहे.

  सध्या लग्नसराई सुरु आहे. अनेकांच्या लग्नाचे बार उडवले जात आहेत. लग्नामध्ये लागणारी खरेदी देखील वाढली आहे. लग्नामध्ये पाहुणे मंडळींना देण्यात येणारी लग्नपत्रिका अत्यंत महत्त्वाची आहे. लग्नपत्रिका खास करण्यासाठी अनेक युक्त्या आजकाल वापरल्या जातात. नवनवीन रंगात आणि ढंगात पत्रिका छापल्या जातात. सध्या सोशल मीडिया एक पत्रिका तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये पत्रिकेवर येणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी खास सुचना टाकण्यात आली आहे.

  लग्नपत्रिकेवर वधु वरासह लग्नासमारंभाची इतर माहिती दिलेली असते. त्याचबरोबर कुटुंबाची नावे देखील टाकली जातात. त्याचबरोबर मागील काही वर्षांपासून पाहुण्यांसाठी खास टीप किंवा सूचना टाकण्याची पद्धत आली आहे. यामध्ये कृपया आहेर आणू नये. किंवा आहेर स्वीकारवला जाणार नाही अशा आशयाच्या टीप दिल्या जातात. मात्र सध्या सोशल मीडियावर एक खास पत्रिका व्हायरल होत आहे. यामध्ये वधु वरांनी लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना विशेष सूचना दिली आहे. या व्हायरल पत्रिकेवर येणाऱ्या पाहुण्यांना सूचना देण्यात आली आहे की “कृपया दारू पिऊन येऊ नये”. अशा सूचनेमुळे ही लग्नपत्रिका हटके ठरत असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sonam Gupta ⭐️ (@sonamgupta2323)

  सोशल मीडियावर पत्रिका व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा व्हायरल लग्नपत्रिकेची खूप चर्चा होत आहे. अनेक लोकांनी विविध मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की ही “नेक्स्ट लेव्हल” आहे, तर कोणी “हे वाचून माझे मन गोंधळले” “आता आम्ही कोणत्याच लग्नाला जाययचं नाही का” अशा कमेंटस या व्हायरल पत्रिकेबाबत येत आहेत.