निळ्या रंगाच्या दोन पंखांनी उर्फी जावेदची लाज राखली, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले- इस ड्रेस को क्या नाम दूं?

उर्फी जावेद आपली अतरंगी स्टाईल आणि हजरजबाबीपणामुळे नेहमी चर्चेत असते. ती इन्स्टाग्रामवरही सक्रिय असून वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट करत असते. आता तिने पोलीस केस सुरू असतानाच चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या शरीराचा काही भाग झाकलेला दिसत आहे.

  इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या कपड्यांमुळे (Cloths) सतत वादात सापडत असते. ती ४ दशलक्ष चाहते असलेल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर (Instagram Account) तिच्या एकाहून एक भन्नाट पोस्ट शेअर करते आणि लोकांच्या टीकेची धनी होत असते. कधी ती नखांनी तर कधी दोरीने शरीर झाकते. एकदा तर तिने स्वत:ला सायकलच्या साखळीने झाकून घेतले होते. रणवीर सिंगपासून (Ranveer Singh) ते मसाबा गुप्तापर्यंत (Masaba Gupta) सर्वांनी तिच्या ड्रेसिंग सेन्सचे (Dressing Sence) कौतुक केले आहे. आता पुन्हा एकदा ती एका वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसली आहे, जी पाहून लोक तिला इस ड्रेस को क्या नाम दूं? असा प्रश्न विचारत आहेत.

  उर्फी जावेदने (Uorfi Javed) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने तिच्या स्तनाच्या निप्पलवर दोन मोठे शिंगाच्या आकाराचे पंख लावले आहेत आणि खाली एक स्कर्ट घातला आहे, जो बाजूने चिरलेला आहे. एकूणच, ती एका निळ्या परीसारखी दिसत आहे. आता हे पाहिल्यानंतर युजर्सच्याही डोक्याचं खोबरं झालं आहे आणि ते तिला विचारत आहेत – इस ड्रेस को क्या नाम दूं? काहीजण म्हणत आहेत – हे काय स्वातंत्र्य आहे, नग्न फिरण्याचे. उर्फी जावेदला या सर्व गोष्टींवर आक्षेप नसला तरी. ती तिच्या धुंदीतच जगत आहे.

  पाहा व्हिडिओ :

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Uorfi (@urf7i)

   

  उर्फी जावेदविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

  यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी तिच्या कपड्यांमुळे तक्रार केल्याने ती पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवते आहे. पोलिसांनी पाठवलेल्या समन्सनंतर उर्फीने आपली बाजू मांडली. ती मुक्त नागरिक असल्याचे तिने सांगितले. तिला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला आवडतात आणि हा घटनेत गुन्हा नाही. जेव्हा मी शूटसाठी बाहेर जाते तेव्हा पापाराझी माझे फोटो क्लिक करतात आणि व्हिडिओ बनवतात आणि ते व्हायरल होतात. यात माझी कोणतीही भूमिका नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Uorfi (@urf7i)

   

  चित्रा वाघ आणि उर्फी जावेदचा पंगा

  उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. या नेत्याने यापूर्वी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत आंबोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. उर्फी जावेद वातावरण बिघडवत असल्याचे त्यांनी म्हटले होते. एवढेच नाही तर चित्रा वाघ या महिला आयोगाकडेही गेल्या होत्या. तेथेही त्यांनी तक्रार दिली होती. मात्र, तेथे त्याबाबत सुनावणी झाली नाही. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगालाही खडसावले होते.