पोलिसांना पडला नियमांचा विसर; हेल्मट न घालता सुसाट पळवली गाडी, व्हिडिओ व्हायरल

सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पोलिस अधिकारी रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.

    वाहतुकींच्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येकाचे कर्तत्वच आहे. नियम हे आपल्या संरक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठीच असतात. मात्र सामान्य माणसांनी नियम पाळले नाही अशावेळी पोलिस कारवाई करतात. मात्र, अनेकदा पोलिस अधिकारीच वाहतूक नियमांना पायदळी तुडवत बिनधास्तपणे प्रवास करताना दिसतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पोलिस अधिकारी रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.

    सोशल मीडियावर पोलिसांची ही व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही दिसत आहे की, दोन पोलिस बाईकवरून सुसाट जात आहे. यावेळी दोघांपैकी एकानेही हेल्मेट घातलेले नाही. हे पाहून बाईकवरून रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेने त्यांना हेल्मेट कुठे आहे, असा प्रश्न विचारला. ती सातत्याने त्यांना हेल्मेटबाबत विचारत राहिली, मात्र पोलिस कोणतेही उत्तर न देता तेथून निघून गेले. यावेळी महिलेच्या मागे बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    हा व्हिडीओ गाझियाबादचा असल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी पोलिसांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर एका युजरने लिहिले की पोलिसांचाच बँड वाजला, खूप छान आहे, हे करायलाच हवे. यावर दुसऱ्या एका युजरने दावा केली की, हा व्हिडीओ जुना आहे, पण तो खरा आहे. तिसऱ्या युजरने लिहिले, जर त्या महिलेच्या जागी एखादा मुलगा असता तर दोघांनी त्याला थांबवून आधी मारहाण केली असती.