इंस्टावर रिल बनवण्याच्या नादात तरुणानं चक्क वसई किल्ल्यातील चर्चलाच लावली आग, पाहा Video

वसई किल्ल्यातील वास्तूंची विटंबना झाल्याचा आरोप दुर्गप्रेमींनी केला आहे. रिल काढण्याच्या नादात या तरुणाने चक्क वसई किल्ल्यातील चर्चलाच आग लावली.

    Viral Video : वसई किल्ल्यात येणाऱ्या काही स्थानिकांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ (Video on Insta) बनवण्याच्या नादात थेट किल्ल्यातील चर्चमध्येच आग लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे वसई किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप किल्लाप्रेमींनी केला आहे. या प्रकाराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष असून या विटंबना करणाऱ्या स्थानिक तरुणावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

    रातोरात प्रसिद्ध होण्यासाठी तरुण काय काय करतील याचा काही नेम नाही. आता चक्क रिल बनवून प्रसिद्धी मिळवण्यासाठी किल्ल्यातल्या चर्चलाच आग लावल्याची घटना समोर आली आहे. वसई किल्ल्यात इन्स्टाग्राम वर व्हिडिओ बनवण्यासाठी थेट किल्ल्यातील चर्च मध्ये आग लावण्यात आली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होत आहे.

    वसई किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. अश्या प्रकारे किल्ल्यामध्ये आग लावून व्हिडीओ बनवणाऱ्या स्थानिक तरुणावर कारवाई करण्याची आता किल्लेप्रेमींकडून मागणी होत आहे. या किल्ल्यात बालेकिल्ला, सात विविध चर्च, साखर कारखाना, प्रवेशद्वार, पुरातन मंदिर अशा अनेक वास्तू आहेत. सध्या यातील अनेक वास्तूंची पडझड होत आहे. तर दुसरीकडे,स्थानिकांमार्फत आणि काही हौशी पर्यटकांमार्फत या किल्ल्याची नासधूसही होत आहे. आता इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवून लाइक्स मिळविणाऱ्या तरुणांनी तर कहर केल्याचं म्हटलं जात आहे.

    या घटनेमुळे वसई किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप दुर्गप्रेमी करत आहेत. काही दुर्गप्रेमींनी याप्रकरणी पुरतत्व विभागाकडे तक्रार केली असून या तरुणावर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे.