fire momoj

सध्या सोशल मीडियावर एका खाण्याच्या पदार्थाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल(Viral Video On Social Media) घालत आहे. ‘फायर मोमोज’(Fire Momos Video) चा हा व्हिडिओ आहे.

    सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ गमतीशीर असतात तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल  होऊन ट्रेंडिंग (Trending Video)मध्ये राहतात. सध्या सोशल मीडियावर एका खाण्याच्या पदार्थाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल घालत आहे. ‘फायर मोमोज’(Fire Momos Video) चा हा व्हिडिओ आहे.

    काही दिवसांपूर्वी फायर पानचा एक व्हिडिओ चर्चेत आला होता. आता इन्स्टाग्रामवरील फायर मोमोजच्या एका व्हिडिओनं नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. paidaishi_foodie (पैदाईशी फुडी) नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

    व्हायरल होत असलेला फायर मोमोजचा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील जयपुरिया मार्केटमधील असल्याचं सांगितलं जात आहे. जयपुरिया मार्केटमधील एका स्टॉलवर फायर मोमोज तयार करून लोकांना खाऊ घातले जात असल्याचं दिसत आहे.