चोरांनी असा गायब केला ५८ फूट लांब ब्रीज, पोलिसही पडले बुचकळ्यात

हा ५८ फूट लांबीचा पूल (Bridge) पूर्व अक्रोन (Akron) मधील कालव्याजवळील मैदानावर ठेवण्यात आला होता. मात्र ३ नोव्हेंबर रोजी पुलाचा काही भाग गायब असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यानंतर आठवडाभरानंतर संपूर्ण पूल गायब झाल्याचे दिसून आले.

    चोरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की, चोरट्यांनी पूर्ण ब्रीज पळवून नेला? होय, अमेरिकेतील ओहायो (Ohio) मध्ये एका महिन्यापूर्वी चोरट्यांनी ५८ फूट लांबीचा पूल चोरला होता. फोटो शेअर करून पोलिसांनी लोकांकडून मदत मागितली आहे की, त्यांच्याकडे या चोरीशी संबंधित काही माहिती असल्यास ती शेअर करा. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याने त्याच्या कारकिर्दीत कधीच ऐकले नव्हते की कोणी एवढी मोठी वस्तू चोरीला गेली आहे.

    आधी गायब झाला होता पुलाचा भाग

    वृत्तानुसार, हा ५८ फूट लांबीचा पूल पूर्व अक्रोनमधील कालव्याजवळील शेतात ठेवण्यात आला होता. मात्र ३ नोव्हेंबर रोजी पुलाचा काही भाग गायब असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यानंतर आठवडाभरानंतर संपूर्ण पूल गायब झाल्याचे दिसून आले.

    या पुलाची किंमत ३० लाखांहून अधिक होती

    हा पूल खूप जुना असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दुरुस्तीच्या प्रकल्पांतर्गत तो कालव्यातून काढून अन्य काही कामासाठी वापरता यावा म्हणून प्रशासनाने तो शेतात ठेवला होता. पण हा पूलच चोरीला जाईल असे कोणाला वाटले नव्हते. शहराच्या अभियांत्रिकी विभागाने या पुलाची किंमत अंदाजे $४०,००० (रु. ३० लाखांहून अधिक) आहे.

    या चोरीने पोलिसही पडले बुचकळ्यात

    हा पूल १० फूट रुंद, सहा फूट उंच आणि ५८ फूट लांब होता. अशा स्थितीत त्याच्या चोरीच्या बातमीने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण एवढा मोठा पुलाचा सांगाडा घेऊन चोर कसे गायब होतील. मात्र, यापूर्वी हा पूल जमिनीपासून दूर नेऊन त्याचे छोटे-छोटे तुकडे करण्यात आले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.

    अजून काहीही पुरावा सापडला नाही…

    अक्रोन (Akron) पोलीस विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी आपल्या २२ वर्षांच्या सेवेत अशी घटना कधी पाहिली नाही किंवा ऐकली नाही. ते म्हणतात – हे रहस्य सोडवण्यासाठी अनेक कोडी सोडवावी लागतील हे आम्हाला माहीत आहे. का, कसे आणि कोण? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतरच चोरीचा उलगडा होणार आहे. सध्या त्यांच्याकडे याबाबत काहीही माहिती नाही.