Road Broken : १.१६ कोटींचा रस्ता! आमदाराने फोडला उद्घाटनाचा नारळ, रस्त्यालाच पडला खड्डा

पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) या ७.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १.१६ कोटी रुपये खर्च केले आहेत. पण जेव्हा आमदाराने उद्घाटनाचा नारळ फोडला खरा पण नारळ न तुटताच रस्त्यालाच खड्डा पडला आहे.

    उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बिजनौर (Bijnor) मधून असाच एक प्रकार समोर आला आहे, की ऐकल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. बिजनौरमध्ये भाजपचे एक आमदार ७ किलोमीटरच्या रस्त्याचे उद्घाटन (Road Inauguration Ceremony) करण्यासाठी आले होते. पण भाऊ, नारळ वाढविण्याची प्रथा पाळण्यासाठी त्यांनी नारळ रस्त्यावर फोडला तेव्हा आश्चर्य वाटले. असे झाले की, नारळ फुटला नाही पण रस्त्यालाच खड्डा पडाला आहे म्हणूनच हसू आवरत नाही!

    एवढ्या पैशांत हा रस्ता बांधला आहे

    वृत्तानुसार, बिजनौर सदर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुची मौसम चौधरी यांनी सांगितले की, पाटबंधारे विभागाने या ७.५ किमीच्या रस्ते बांधणीसाठी १.१६ कोटी रुपये खर्च केले आहेत. मला त्याचे उद्घाटन करण्यास सांगितले होते. येथे पोहोचून उद्घाटनाचा नारळ फोडण्याचा प्रयत्न केला असता नारळ फुटला नाही, उलट रस्त्यालाच खड्डा पडला आहे.

    तपासणीसाठी नमुने पाठवून दिले

    ते पुढे म्हणाले, ‘मी रस्त्याची तपासणी केली असता बांधकाम दर्जेदार नसल्याचे आढळून आले. आम्ही उद्घाटन थांबवले आणि मग मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. डीएमने तीन सदस्यीय टीम तयार केली आहे. बांधकाम साहित्याचे नमुने घेण्यासाठी पाठविण्यात आले. जवळपास तीन तास आम्ही तिथे थांबलो. प्रत्येक गोष्टीला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. मानकांनुसार रस्ता करण्यात येईल, असे आश्वासन डीएम यांनी दिले आहे.