आरारारा लैच खतरनाक! म्हशीने वंदे भारत ट्रेनला टक्कर दिल्याने झालीये भयंकर अवस्था कारण…

एका म्हशीने टक्कर दिल्याने (Being hit by a buffalo) तिची अशी भयंकर अवस्था (Bad Condition) केली आहे की, सहा दिवसांपूर्वी उद्घाटन झालेली हीच ती ट्रेन आहे का असा पाहणाऱ्यालाही प्रश्न पडाला नाही तर नवलच. या ट्रेनची झालेली अवस्था पाहून या ट्रेनच्या बनावटीसाठी काय प्रकारचं साहित्य वापरलं असेल याची कल्पनाच न केलेली बरी.

    नवी दिल्ली : सहा दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Prime Minister Of India) यांनी वंदे भारत एक्सप्रेसला (Vnde Bharat Express) हिरवा झेंडा दाखविला होता. मोठ्या दिमाखात गाजावाजा करत उद्घाटन झालेल्या या ट्रेनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे (A photo of this train, which was inaugurated with great fanfare, is currently going viral on social media).

    एका म्हशीने टक्कर दिल्याने (Being hit by a buffalo) तिची अशी भयंकर अवस्था (Bad Condition) केली आहे की, सहा दिवसांपूर्वी उद्घाटन झालेली हीच ती ट्रेन आहे का असा पाहणाऱ्यालाही प्रश्न पडाला नाही तर नवलच. या ट्रेनची झालेली अवस्था पाहून या ट्रेनच्या बनावटीसाठी काय प्रकारचं साहित्य वापरलं असेल याची कल्पनाच न केलेली बरी. मेक इन इंडिया अंतर्गत ही मेड इन इंडिया ट्रेन असली तरी एका म्हशीने दिलेल्या धडकेने ट्रेनची अशी व्हावी यावरूनच साहित्याचा दर्जा किती सुमार आहे याचा अंदाज न लावलेलाच बरा.

    Congress @INCIndia या ट्विटर हँडलवर हा फोटो शेअर करण्यात आला असून वंदे भारत ट्रेनच्या सुमार दर्जाची पोलखोल करण्याच्या उद्देशानेच हा फोटो शेअर करण्यात आला आहे. तीन तासांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या फोटोला बातमी लिहिपर्यंत ९२०० लोकांनी हा फोटो लाइक केला आहे.