शाळेच्या सहलीच्या नावावर शिक्षिकेचे विद्यार्थ्याला वेगळेच धडे, किस करत रोमँटिक फोटोशूट; तक्रारीनंतर शिक्षिकेचं निलबंन!

हे फोटोशूट इंटरनेटवर चांगलच व्हायरल झालं. तसेच मोबाईलमधील हे रोमँटिक फोटोशूट व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पालकांपर्यंतही पोहोचलं. संतप्त पालकांनी शाळेत येऊन चांगलाच गोंधळ घातला. तसेच संबंधित शिक्षिकेविरोधात कारवाईची मागणी केली.

    सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. काही गंभीर तर काही गमतीशीर व्हिडिओ पाहण्यात येतात. अनेक फोटो व्हिडिओ नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतात. कधी कधी काही फोटो व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतात. तर काहींवरून वादाला तोंड फुटतं. सध्या इंटरेनटवर व्हायरल झालेलं एक रोमँटिक फोटोशूट चर्चेचा तसेच वादाचा विषय ठरला आहे. हे फोटोशटू कोणत्या कपलने केलं नसून शाळेच्या सहलीत एका शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यासोबत केलं आहे. यावरुन आता बरीच टिका होत आहे. पालकांनी रोष व्यक्त केल्यावर या शिक्षिकेचं निलबंन करण्यता आलं आहे.

    नेमका प्रकार काय?

    हे संपूर्ण प्रकरण कर्नाटकमधील चिंतामणी तालुक्यातील असून, येथील मुरुगमल्ला गावामध्ये एका सरकारी हायस्कूलमधील शिक्षिकेने आणि एका विद्यार्थ्याने हे फोटो काढले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर या शाळेत एकच गोंधळ उडाला. शाळेचे कर्मचारी व विद्यार्थी 22 ते 25 डिसेंबर दरम्यान सहलीला गेले होते. यावेळी शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत  फोटोशूट केलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये महिला शिक्षिका आणि विद्यार्थी हे रोमँटिक पोझ देताना दिसत आहेत. फोटोशूटदरम्यान, विद्यार्थी कधी शिक्षिकेला किस करताना, तर कधी त्यांच्या साडीचा पदर पकडताना दिसत आहे. हो फोटो कुणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर यावरुन वादाला तोंड फुटलं आहे.

    शिक्षिकेचं निलंबन

    या शिक्षिकेने सहलीवेळी विद्यार्थ्यासोबत रोमँटिक फोटोशूट केलं. पाहता पाहत हे फोटोशूट इंटरनेटवर चांगलच व्हायरल झालं. तसेच मोबाईलमधील हे रोमँटिक फोटोशूट व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पालकांपर्यंतही पोहोचलं. संतप्त पालकांनी शाळेत येऊन चांगलाच गोंधळ घातला. तसेच संबंधित शिक्षिकेविरोधात कारवाईची मागणी केली. शाळा प्रशासनाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर शिक्षकेला निलंबित करण्यात आले आहे. चिक्कबल्लापूर जिल्हा शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी बीईओच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.