लग्न मंडपात उडाला आगीचा भडका; लोकं मारत होते चिकन मटणावर ताव, पहा हा काळजाचा थरकाप उडविणारा Viral Video

भिवंडीतील (Bhiwandi Fire) एका मैदानात (Ground) लग्न समारंभाला लागलेल्या आगीत पाहुणे जेवण करतानाचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    मुंबई : मुंबई (Mumbai) जवळील भिवंडीमध्ये (Bhiwandi) एका लग्ना (Marriage) दरम्यान रिसेप्शनसाठी लावलेल्या मंडपात (Tent) अचानक आग (Fire) लागली. मात्र असे असतानाही रिसेप्शनला (Reception) आलेले पाहुणे (Guests) फूड (Food) खाण्यात व्यस्त होते.

    भिवंडीतील (Bhiwandi Fire) एका मैदानात (Ground) लग्न समारंभाला लागलेल्या आगीत पाहुणे जेवण करतानाचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    लग्नाच्या रिसेप्शनसाठी लावलेल्या मंडपात भीषण आग लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. आगीच्या ज्वाळा भडकलेल्या असतानाही लोक अगदी सहजतेने चिकन आणि मटणावर ताव मारताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारे लोक पाहून कळते की, त्यांना मंडपाच्या मागच्या बाजूला आग लागल्याची माहिती होती, मात्र असे असतानाही ते तिथून निघून जाण्याऐवजी लग्नाच्या जेवणाचा आस्वाद घेत राहिले. हा व्हायरल व्हिडिओ पाहून लोक मजेशीर कमेंट करत आहेत.

     

    मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. ज्या तंबूला आग लागली तो तंबू एका मोठ्या मैदानात लावण्यात आला होता, त्यामुळे लोकांना वेळेत बाहेर पडता आले. या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.