मेट्रोनंतर आता दिल्लीत बसमध्ये बिकिनी गर्ल, अर्धनग्न महिलेचा व्हिडिओ व्हायरल; कुणाचा संताप तर कुणाचं समर्थन!

व्हायरल होत असलेल्या 12 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक महिला डीटीसी बसच्या दरवाजाजवळ उभी आहे. तिने फक्त अंतर्वस्त्रे परिधान केली आहेत. बसमध्ये इतर प्रवासीही बसले आहेत. बस कंडक्टरही महिलेजवळ उभा आहे.

    वर्षभरापूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये एका मुलीनं बिकिनी घालून प्रवास केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर अनेक टिका होऊ लागल्या. दिल्ली मेट्रोमध्ये आक्षेपार्ह कृती करण्यावर अंकुश लावण्यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न करण्यात आले मात्र, त्यांचे सगळे प्रयत्न फोल ठरताना दिसले. आता दिल्लीत बसमध्येही असाच एक प्रकार पाहायला मिळाला आहे. दिल्लीत बसमध्ये एक महिला बिकिनी घालून प्रवास करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Delhi Bus Viral Video) झाला असून लोकांमध्ये प्रचंड सतांपाच वाताावरण पाहायला मिळत आहे तर, काही लोकांनी तिचं समर्थनही केलं आहे.

    मेट्रोनंतर आता डीटीसी बसमध्येही अश्लीलता

    दिल्लीच्या बसमधील व्हायरल होत असलेल्या 12 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक महिला बसच्या दरवाजाजवळ उभी आहे. तिने फक्त अंतर्वस्त्रे परिधान केली आहेत. बसमध्ये इतर प्रवासीही बसले आहेत. बस कंडक्टरही महिलेजवळ उभा आहे, काही वेळाने तिथून निघून जातो. ही DTC बस असल्याचे सांगण्यात येत आहे.

    लोकांमध्ये प्रचंड संताप

    दिल्लीच्या बसमध्ये अर्धनग्न महिलेचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून लोकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. काही जण म्हणत आहेत की, ‘हे चुकीचे आहे.’  काहींनी तर तिला ‘दिल्ली पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकावे.’ असं म्हण्टलं आहे. ‘यावर कठोर कारवाई व्हायला हवी.’ असं म्हणत अनेकांनी दिल्ली पोलिस आणि सरकारला यावर कारवाई करण्याची मागणी केली. तर एका युझरने म्हण्टलं की,  “हे तिचे शरीर आणि तिची निवड आहे. तिला एकटे सोडा,”