गलिच्छपणाचा कळस! नशेत धुंद असलेल्या आमदाराच्या निकटवर्तीयाने आदिवासी तरुणावर केली लघुशंका, व्हिडिओ व्हायरल

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्ती एक तरुणावर लघवी करत असल्याचे दिसत आहे. हा प्रकरण नऊ दिवस जुने आहे, मात्र याचा व्हिडीओ आता व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

  माणुसकीला काळीमा फासणारी घटना मध्य प्रदेशात घडली आहे. मध्यप्रदेशच्या (madhya pradesh) सिधी येथील माजी भाजप आमदार केदार शुक्ला यांच्या प्रतिनिधी प्रवेश शुक्लाने दारुच्या नशेत एका आदिवासी तरुणावर लघुशंका (Urinating on Tribal) केल्याची लाजीरवाणी घटना समोर आली आहे.  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची दखल घेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी दोषीला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  नेमका प्रकार काय?

  मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्ती एक तरुणावर लघवी करत असल्याचे दिसत आहे. हा प्रकरण नऊ दिवस जुने आहे, मात्र याचा व्हिडीओ आता व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. सिधी जिल्ह्यातील कुबरी बाजार येथे एक युवक बसला  होता. यावेळी भाजप आमदार केदार शुक्ला यांच्या प्रतिनिधी प्रवेश शुक्लाने नशेच्या अवस्थेत त्यांच्यावर लघवी केली. या युवकाचे नाव पाले कोल असून तो सिधी जिल्ह्यातील करोंडी गावचा रहिवासी आहे. मात्र, हे प्रकरण पेटल्यानंतर भाजप आमदार केदार शुक्ला यांनी प्रवेश शुक्ला हा आपला प्रतिनिधी नसल्याचे सांगितले.

  मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नाराजी व्यक्त केली

  दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. या घटनेबद्दल ट्विट करताना ते म्हणाले, “सिधी जिल्ह्याचा एक व्हायरल व्हिडिओ माझ्या निदर्शनास आला आहे. या प्रकरणी दोषींना अटक करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिल्या. यानंतर आरोपीवर त्याच्यावर आयपीसी आणि एससी/एसटी कायद्याच्या कलम 294,504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

  काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर सांगितले की, सिधी जिल्ह्यातील एका आदिवासी तरुणावर लघवी करण्याच्या क्रुरतेचा व्हिडिओ समोर आला आहे. आदिवासी समाजातील तरुणांसोबतच्या अशा घृणास्पद आणि निंदनीय कृत्याला सुसंस्कृत समाजात स्थान नाही.