चिमुकलीला बेदम मारहाण! काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला एका लहान मुलीला बेदम मार देत आहे.

    सध्या लहान मुलांच्या छळांचे प्रमाण वाढले आहे. अनेक व्हिडिओ याबाबत सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला एका लहान मुलीला बेदम मार देत आहे. अगदी कपड्यांने उचलून ही महिला चिमुकलीला मारहाण करत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर संतापजनक कमेंट्स येत आहेत.

    व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरातमधील असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये मारहाण करणारी महिलाच त्या चिमुकल्या मुलीची आई आहे. आई आपल्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण करत आहे. अगदी उलताण्याने ही महिला मुलीला मारत आहे. मुलगी व्हिडिओमध्ये अतिशय रडताना दिसत असून न मारण्याची विनंती करत आहे. मात्र निर्दयी आई मुलीला अतिशय जोरजोरात मारत आहे.

    व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर कमेंटसचा वर्षाव केला आहे. एवढ्या लहान मुलीला मारहाण करताना त्या महिलेला काहीच वाटत नाही का असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी या महिलेवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच अनेकांनी त्या महिलेला खडेबोल सुनावले आहेत.