काकांचा स्वॅग लैच भारी, उतारवयात केला विवाह; मिळाली नवतरुणी अन् लग्नाळूंच्या काळजाची झाली शकलं म्हणतात, ‘यापरीस विष खाऊन मेलेलंच बरं’

लहानपणापासूनच प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचे स्वप्न पाहणे असतेच त्यातही आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा ही सर्वांचीच माफक अपेक्षा त्यात समाविष्ट असते. मुलगी असो वा मुलगा, जोपर्यंत त्याला हवा तो जोडीदार मिळत नाही तोपर्यंत तो चांगल्या आयुष्याचा जोडीदार शोधत राहतो. आजकालच्या पोरांना विचारलं की लग्न का होत नाही, तर ते म्हणतात आजकाल चांगल्या आणि सुंदर मुली कुठे मिळतात?

    अनेक मुले ३५-४० वर्ष उलटूनही आयुष्यात चांगल्या मुली शोधतात. अनेक वेळा अशी मुलं अविवाहित राहतात किंवा घरच्यांच्या मर्जीनुसार लग्न करून सेटल होतात. दुसरीकडे, नवतरुण आणि सुंदर मुलीशी लग्न करणाऱ्या या वृद्ध काकांना तर आभाळचं ठेंगणं झालंय राव.

    काकांना त्यांच्याहून निम्म्या वयाची वधू मिळालीये

    होय, तुम्ही अनेकदा मुलांना चांगली मुलगी न मिळाल्याने रडताना पाहिलं असेल, पण आम्ही तुम्हाला अशा एका वृद्धाची ओळख करून देणार आहोत, ज्याला आपल्याहून निम्म्या वयाची वधू मिळाली आणि त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एवढी तरुण वधू मिळाल्यावर वृद्ध काकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. या लग्नामुळे ते खूप खूश असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य स्पष्टपणे सांगत होते.

    या जोडीचा जबरदस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे

    इंटरनेटवर व्हायरल झालेल्या बातम्यांनी भरलेल्या जगात अशा बातम्या लोकांना हैराण करत आहेत. हे वृद्ध काका आणि तरुण वधूच्या जोडीचा एक अप्रतिम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा वृद्ध वर लग्नाच्या स्टेजवर बसून हसत आहे.

    पाहा व्हिडिओ :

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Psycho Bihari (@bihari.broo)

     

    मध्यमवयीन वराच्या चेहऱ्यावरचे हसू थांबण्याचे नाव घेत नाही

    व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मध्यवयीन काका एका तरुण मुलीसोबत स्टेजवर बसले आहेत. व्हिडिओमध्ये वधू शांतपणे बसलेली आहे. त्याचवेळी मध्यमवयीन वराच्या चेहऱ्यावरचे हसू थांबण्याचे नाव घेत नाही. सोशल मीडियावर अविवाहित मुलांच्या काळजाची शकलं करणारा हा व्हिडिओ सायको बिहारी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स खूप मजा करत आहेत.

    सिंगल असणाऱ्यांच्या काळजाची झालीयेत शकलं

    इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या वृद्ध काका आणि तरुण वधूचा व्हिडिओ पाहून लोक विविध कमेंट करत आहेत. घोड्यांना खायलाही घास मिळत नाही, तर म्हातारे च्यवनप्राश खात असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. एका युजरने लिहिले आहे की, हे सर्व पाहून जगण्याची इच्छा मरून गेली आहे. एकाने लिहिले आहे की, हे सर्व पाहून माझे हृदय तीळ तीळ तुटत आहे.