Viral Video : या आईस्क्रीमची बातच आहे न्यारी कारण…

पावभाजी हा अनेकांचा वीक पॉईंट पण तीच पावभाजी तुम्हाला आईस्क्रीमच्या फॉर्ममध्ये मिळाली तर मग काय? खवय्यांना तर आकाशच ठेंगणं झाल्यासारखं आहे. हा व्हिडिओ अबोली कस्तुरी यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओत पावभाजी आईस्क्रीम तयार करण्याची पद्धत सांगितली आहे.

  तुम्ही उत्तम खवय्ये (Foodie) असलात तर सतत काहीतरी नाविण्यपूर्ण पदार्थाच्या शोधात असता. तो पदार्थ खाण्याच्या अट्टाहासापायी तुम्ही काहीही करायला आणि तो पदार्थ जिथे मिळतो तिथे जावून त्याची चव चाखायलाही आपण कमी करत नाही. सध्या काळ व्हायरल व्हिडिओचा (Viral Video) आहे. जो आपल्याला चांगलं दिसतं जे वाटतं ते शेअर (Share) करायला लोकं अजिबात कचरत नाहीत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. तो म्हणजे पावभाजी आईस्क्रीमचा (Pav Bhaji Ice Cream).

  पावभाजी हा अनेकांचा वीक पॉईंट पण तीच पावभाजी तुम्हाला आईस्क्रीमच्या फॉर्ममध्ये मिळाली तर मग काय? खवय्यांना तर आकाशच ठेंगणं झाल्यासारखं आहे. हा व्हिडिओ अबोली कस्तुरी यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओत पावभाजी आईस्क्रीम तयार करण्याची पद्धत सांगितली आहे. अशी आईस्क्रीम तयार होताना पाहणं म्हणजे आपणच आपली भूक आपसूकच चाळवली गेली नाही तर नवलंच. या व्हिडिओवर अबोली कस्तुरी यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

  सोडलं…सोडलं…
  आज पासून स्वैपाक करणं सोडलं
  हे हात आता खाली घेणारच नाही

  हा मूळ व्हिडिओ The Great Indian Foodie या Instagram अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्हालाही कधी पावभाजी खावीशी वाटली तर या पावभाजी आईस्क्रीमचा आस्वाद नक्कीच घ्या.