Viral Video : उणे ५६ अंश तापमानात हरणाचे झाले असे हाल, व्हिडिओ पाहून लोकांनाही भरली हुडहुडी

हा व्हिडिओ कझाकिस्तानचा आहे. उणे ५६ अंश तापमान असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे रस्त्याच्या कडेला एक हरिण गोठले असल्याची माहिती समोर आली आहे.

  ही बातमी वाचताना तुम्ही रजाईत बसून उबदारपणाचा आनंद लुटत असाल किंवा थंडगार शेकोटीजवळ बसून चहाचे फुरके मारत असाल. वास्तविक, सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत आहे. त्याच वेळी, उत्सवाची वेळ देखील सुरू आहे, कारण नवीन वर्षासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. अनेक जण डोंगरावर बर्फवृष्टीचा आनंद लुटत आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, तापमान घसरल्याने प्राण्यांचे काय होते? सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की, उणे ५६ अंश तापमानामुळे एवढी थंडी होती की, एक चालणारे हरीण गोठले होते.

  व्हिडिओत आहे तरी काय?

  हा व्हिडिओ कझाकिस्तानचा आहे. उणे ५६ अंश तापमान असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे रस्त्याच्या कडेला एक हरीण भयंकर अवस्थेत उभे होते. दुरून पाहिल्यावर जणू पुतळाच आहे असा भास होत होता. पण काही लोक जवळ आल्याचे बघून हरणात जीव आला आणि तो धावू लागला.

  स्थानिक लोकांनी केली मदत

  मात्र, काही अंतर चालल्यानंतर रस्त्याच्या मधोमध येताच तो पुन्हा गोठला. मग एक माणूस त्याला पकडतो. स्थानिक लोकांनी गोठलेल्या हरणाला पुन्हा पुन्हा पकडून त्याच्या अंगावरील बर्फ काढून टाकला म्हणजे त्याला आराम मिळेल असा दावा करण्यात आला! ही क्लिप memewalanews इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले – गोठलेले हरीण.

  पहा व्हिडिओ

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meme wala (@memewalanews)