शाळेमध्ये चाललयं काय? मुख्यध्यापिका फेशियल करताना व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ काढणाऱ्या शिक्षिकेवर हल्ला

शाळेमध्ये फेशियल करणाऱ्या मुख्याध्यापिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    शाळा कॉलेज यांना विद्येचे घर म्हटले जाते. शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी शाळा आणि कॉलेजमध्ये विद्यार्थी येत असतात. मात्र शाळेमध्ये शिकवण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांनी मात्र याचा गैरवापर केला तरी ती अत्यंत वाईट गोष्ट आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाळेतील मुख्यध्यापिकेने शाळेचे पार्लर करुन टाकले आहे. शाळेमध्ये फेशियल करणाऱ्या मुख्याध्यपिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शाळेतील सहाय्यक शिक्षिकेने हा व्हिडिओ तिच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे.

    प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापिका शिक्षिका फेशियल करण्यात मग्न होत्या. त्यानंतर सहाय्यक शिक्षिका मोबाईल कॅमेरा चालू करून आत रूममध्ये शिरल्या. यादरम्यान त्यांनी (Principal Facial During School Time Video) ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. त्यामुळे संतापलेल्या मुख्यध्यापिकेने या शिक्षिकेवर हल्ला केला. ती शिक्षिकेच्या हाताला चावल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुख्यध्यापिकेने सहाय्यक शिक्षिकेच्या हाताचा चावा घेतला आहे.

    सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की मुख्यध्यापिका सहाय्यक शिक्षिकेच्या हाताला चावली आहे. तसेच दुसऱ्या हातातून रक्त देखील येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सहाय्यक शिक्षकाच्या वैद्यकीय तपासणीच्या आधारे, बिघापूर पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेआहेत. याबाबत बोलताना बिघापूर मंडळ अधिकारी माया राय यांनी शाळेच्या वेळेत फेशियल केल्याची आणि पकडल्यास मारहाण केल्याची तक्रार शाळेच्या सहाय्यक शिक्षिकेकडून मिळाल्याला दुजोरा दिला. त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल,’ असं संबंधित अधिकारी म्हणाले आहेत. शाळेमध्ये असे भयानक प्रकार घडत असल्यामुळे पालकांनी भीती व्यक्त केली आहे.