
एका तरुणीने ‘बेशरम रंग’(Besharam Rang) या गाण्याचं रिक्रिएशन करुन बोल्ड अंदाजात डान्स केल्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सायरा नावाच्या मुलीनं ‘बेशरम रंग’ गाण्याचं लिप्सिंग करुन सुंदर डान्स (Dance Video) केला आहे.
शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा ‘पठाण’ (Pathaan) सिनेमा २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ‘बेशरम रंग’ (Besharam Rang Song) गाण्यानं चाहत्यांना भुरळ घातली आहे. दीपिकाचा या सिनेमातील बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या गाण्याचं वेड अनेकांना लागलं आहे. अनेक जण या गाण्यावरच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. एका तरुणीने ‘बेशरम रंग’ या गाण्याचं रिक्रिएशन करुन बोल्ड अंदाजात डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सायरा नावाच्या मुलीनं ‘बेशरम रंग’ गाण्याचं लिप्सिंग करुन सुंदर डान्स केला आहे. दीपिका पादुकोण बेशरम रंग गाण्यावर जबरदस्त डान्स करताना टीव्हीत दिसत आहे. त्याचवेळी ती तरुणीही दीपिकाने केलेल्या स्टेप्स जशाच्या तशा करताना दिसत आहे.
View this post on Instagram
या तरुणीचा व्हिडीओत बोल्ड अंदाज पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एक नेटकरी म्हणाला, “हे खूप सुंदर आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “दीपिकापेक्षा भारी डान्स केला आहे”. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली असून हर्ट आणि लव्हचे इमोजीही पाठवले आहेत.
दीपिका आणि शाहरुखची सिझलिंग केमिस्ट्री पाहून तमाम चाहते त्या दोघांवर फिदा झाले आहेत. हे गाणं खूप लोकप्रिय होत आहे. गाण्यात असलेला बोल्ड अंदाज पाहून काही तरुणींना याच गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता आलेला नाही. एका तरुणीने दीपिकाने केलेल्या दिलखेचक अदा जशाच्या तशा कॅमेरासमोर करण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणी दीपिकाच्या ‘बेशरम रंग’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना या व्हिडीओत दिसत आहेत. तरुणीने ‘बेशरम रंग’ या गाण्यावर रिक्रिएट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चांगल्या प्रतिक्रियादेखील येत आहेत.