Woman lives in the guise of man for 36 years

पुरुष प्रधान समाजात मुलीच्या संगोपनासाठी एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. तामिळनाडूच्या तूतुकुडी जिल्ह्यातील 57 वर्षीय एस. पेचियाम्मल नामक महिलेची करुण कहानी उजेडात आल्यानंतर ती समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे(Woman lives in the guise of man for 36 years).

  चेन्नई : पुरुष प्रधान समाजात मुलीच्या संगोपनासाठी एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. तामिळनाडूच्या तूतुकुडी जिल्ह्यातील 57 वर्षीय एस. पेचियाम्मल नामक महिलेची करुण कहानी उजेडात आल्यानंतर ती समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे(Woman lives in the guise of man for 36 years).

  ती कटुनायक्कनपट्टी नामक गावात राहत होती. या महिलेच्या पतीचे लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांतच निधन झाले. तेव्हा ती केवळ 20 वर्षांची होती. तिची पुन्हा लग्न करण्याची इच्छा नव्हती. हे एक पुरुषप्रधान गाव होते. पतीच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिच्या पालनपोषणासाठी तिला काम करावे लागले.

  लोकांनी छळल्यानंतर केले वेषांतर

  गावात लोक त्यांचा छळ करत होते. आपल्या पोटच्या गोळ्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी काम करुन पाहिले. पण, सर्वच ठिकाणी टोमणे व त्रास मिळाला. येथूनच पेचियाम्मल यांनी पुरूष प्रधान समाजात पुरूष म्हणूनच वावरण्याचा निश्चय केला. त्यांनी तिरुचेंदुर मुरुगन मंदिरात जावून आपले केस दान केले. साडीच्या जागी शर्ट व लुंगी घालणे सुरू केले. एवढेच नाही तर त्यांनी आपले नाव बदलून मुथु असे केले. स्वतःचे नाव बदलल्यानंतर जवळपास 20 वर्षांनी त्या कट्टुनायक्कनपट्टी गावात स्थायिक झाल्या. त्यांच्या केवळ नातेवाईक व मुलीलाच त्या पुरूष नव्हे तर स्त्री असल्याचे माहित होते.

  त्यांनी सांगितले की, मी पेंटिंग, चहा व पराठे करण्यापासून 100 दिवस मजुरी करण्यासारखी विविध प्रकारची कामे केली. यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी स्वतःचे व स्वतःच्या मुलीचे पालन पोषण केले. कालांतराने मुथु हीच माझी ओळख बनली. माझा आधार क्रमांक, मतदान ओळखपत्र व बँक खात्यासह सर्वच सरकारी दस्तावेजांवरही तेच नाव जोडले गेले. पेचियाम्मल यांची मुलगी शणमुगासुंदरीचे लग्न झाले आहे. पण, पेचियाम्मल यांना अखेरच्या श्वासापर्यंत आपले हे रूप कायम ठेवायचे आहे.

  सरकारकडून मदतीची अपेक्षा

  पेचियाम्मलचे आता वय झाले आहे. त्यांना पूर्वीसारखे काम होत नाही. त्यांनी वर्षभरापूर्वीच एक महिला म्हणून मरनेगा जॉब कार्ड प्राप्त केले. माझ्याकडे घर नाही किंवा बचतही नाही. मी विधवेच्या प्रमाणपत्रासाठीही अर्ज करू शकत नाही. त्यामुळे सरकारने मला आर्थिक मदत करावी, असे त्या म्हणाल्या.